जिल्हा वार्षिक नियोजनचा निधी मार्च 2022 अखेर 100 टक्के खर्च करण्यात रायगड जिल्हा राज्यात अव्वल स्थानी

                                                          

जिल्हा वार्षिक नियोजनचा निधी मार्च 2022 अखेर 100 टक्के खर्च करण्यात रायगड जिल्हा राज्यात अव्वल स्थानी


     *अलिबाग, दि.31 (जिमाका):-* जिल्हा वार्षिक नियोजनचा निधी विहित कालावधीत (मार्च 2022 अखेर) खर्च करण्यात राज्यात रायगड जिल्ह्याने अव्वल स्थान पटकाविले आहे. आर्थिक वर्ष 2021-22 करिता शासनाकडून जिल्हा वार्षिक नियोजनचा मंजूर व प्राप्त निधी रु.275 कोटी इतका होता. हा संपूर्ण निधी पालकमंत्री कु.आदिती तटकरे आणि जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील विविध विकास व प्रशासकीय कामांसाठी शासकीय यंत्रणांना वितरीत करण्यात आला होता. यासाठी जिल्हा नियोजन अधिकारी श्री.मेहेत्रे, सहायक जिल्हा नियोजन अधिकारी श्री.देसाई आणि त्यांच्या इतर सर्व कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले.

     आज दि.31 मार्च 2022 अखेर राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी रायगड जिल्ह्याने रु.275 कोटी हा संपूर्ण निधी 100% खर्च करण्यात प्रथम क्रमांक पटकाविला आहे. हे सर्वांच्या योग्य नियोजनाचे यश आहे.



Popular posts
संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांच्या शुभहस्ते मराठा भवन कार्यालयाचे भव्य उद्घाटन आणि मराठा कृतज्ञता मेळावा उत्साहात संपन्न
Image
यशवंतराव चव्हाण सेंटर नवी मुंबई केंद्र व कवी कुसुमाग्रज सार्वजनिक वाचनालय संस्था सिवूड नेरूळ नवी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने_ भव्य सत्कार समारंभ
Image
सिडकोच्या मुजोर धोरणांना लगाम; विक्रांत पाटील यांच्या पाठपुराव्याला यश!
Image
पनवेल महानगरपालिकेला ‘माझी वसुंधरा अभियान 3.0’ अंतर्गत मिळालेल्या राज्यस्तरीय पारितोषिकातून सौर-ट्री प्रकल्पांना गती
Image
हाय टेन्शन तार तुटून पनवेल पंचशील नगर झोपडपट्टीत आग भडकली अनेक झोपड्या जळून खाक; प्रशासनाचा तत्पर हस्तक्षेप
Image