नवी मुंबई महानगरपालिका- फिफा अंडर-17 वुमन्स वर्ल्ड कप इंडिया – 2022 स्पर्धेनिमित्त 'किक ऑफ दी ड्रीम कार्निव्हल' उपक्रमाचे आयोजन

 नवी मुंबई महानगरपालिका- 

 फिफा अंडर-17 वुमन्स वर्ल्ड कप इंडिया – 2022 स्पर्धेनिमित्त 'किक ऑफ दी ड्रीम कार्निव्हल' उपक्रमाचे आयोजन





 

नवी मुंबई येथील एनएमएमसी यशवंतराव चव्हान मैदानात सोमवारी 25 एप्रिल 2022 रोजी स्थानिक आयोजन समितीने (एलओसी) फिफा अंडर-17 वुमन्स वर्ल्ड कप इंडिया – 2022 स्पर्धेनिमित्त 'किक ऑफ दी ड्रीम कार्निव्हल' उपक्रमाचे अनावरण केले. यादरम्यान नवी मुंबई परिसरातील सुमारे 650 हून अधिक शालेय विद्यार्थ्यांनी विविध उपक्रमांमध्ये सहभाग घेतला. या फुटबॉल कार्निव्हलमध्ये सर्वांसाठी फुटबॉल वर आधारीत मजेशीर मैदानी खेळ, विविध उपक्रम आणि विविध आव्हानांची निर्मिती करण्यात आली आहे.

फुटबॉलवर आधारीत या उपक्रमांच्या माध्यमातून चिमुकल्यांनी लैंगिक विषमतेला भेद देत मुक्तपणे आपल्या कलागुणांना वाव देणे, हा 'किक ऑफ दी ड्रीम कार्निव्हल' चे मुख्य उद्देश आहे. मुलांनी या उपक्रमामध्ये मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने सहभाग घेतला. हेडर चॅलेंज, अ फुटबॉल स्टाइल डार्ट बोर्ड चॅलेंज, फ्री कीक चॅलेंज हे लक्षवेधी उपक्रम ठरले. तसेच, यादरम्यान मुलांनी ब्रश आणि रंगांच्या सहाय्याने आपल्या कल्पकतेला आणि कलागुणांना वावही दिला. त्याचप्रमाणे यावेळी, ए-5 विरुद्ध 5 अशी फुटबॉल चॅलेंज स्पर्धाही अयोजित करण्यात आली होती, ज्यामध्ये तंदूरूस्ती स्पर्धेतील 16 संघांनी सहभाग घेतला होता.

'किक ऑफ दी ड्रीम कार्निव्हल उपक्रमाद्वारे मुलांना फुटबॉलवर आधारीत उपक्रमांमध्ये गुंतवून ठेवत त्यांच्या कलागुणांना वाव देण्याचा उद्देश आहे. या उपक्रमांमध्ये सहभागी होत मुलांना मजा मस्तीसोबतच सांघिक कामगिरी आणि नेतृत्त्व कौशल्य शिकण्यास मिळेल. पण या उपक्रमाद्वारे आमचा मुख्य उद्देश आहे की, जगभरात मिलियन लोक या सुंदर खेळाद्वारे जो आनंद घेत आहेत, तो आनंद या मुलांनी अनुभवावा.

'यामध्ये सहभागी असलेल्या प्रत्येक सदस्याचा उत्साह अनुभवने प्रेरणादायी आहे. शेवटी या उपक्रमामध्ये मुलांचा मिळालेला मोठा सहभाग फार उत्साहवर्धक असून भविष्यातील उपक्रमांसाठी हे अत्यंत महत्त्वाचे आहे,' असे एलओसी फिफा अंडर- 17 वुमन्स वर्ल्ड कप इंडिया – 2022 च्या प्रकल्प संचालिका (प्रोजेक्टडायरेक्टर) नंदिनी अरोरा यांनी सांगितले.

या कार्निवल प्रसंगी क्रीडा विभागाचे उप आयुक्त श्री. मनोजकुमार महाले, शिक्षण विभागाचे उप आयुक्त श्री. जयदीप पवार यांच्या सह एलओसी, फिफा अंडर-17 वुमन्स वर्ल्ड कप इंडियाचे प्रोजेक्ट डायरेक्टर श्रीम. नंदिनी अरोरा आणि श्री. अंकुश अरोरा यांची विशेष उपस्थिती होती.


 


Popular posts
उरण तालुक्यात शेकापक्षाला पुन्हा नवी उभारी येणार.-पक्षाच्या उरण तालुका चिटणीस पदावर कामगार नेते रवि घरत यांची नियुक्ती
Image
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर जयंती साजरी
Image
तळोजा एमआयडीसीतील प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर आमदार प्रशांत ठाकूर यांची उद्योगमंत्र्यांकडे रासायनिक व मत्स्यप्रक्रिया उद्योगांचे स्थलांतर करण्याची मागणी
Image
पनवेल महानगरपालिका विद्युत विभाग प्रमुख प्रितम पाटील यांच्या तत्परतेने पेंधर येथील मोठी दुर्घटना टळली
Image
जहांगीर आर्ट गॅलरीत चित्रकार बी.महाजन,एस.तांबटकर व रसिका महाजन यांच्या चित्रांचे प्रदर्शन संपन्न
Image