आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ विचारवंतः संपादक: धम्मरत्न आंतरराष्ट्रीय पुरस्कार 1ले महाराष्ट्रीयन मानकरी काशिराम जी पैठणे यांना 69 व्या वाढदिवसानिमित हार्दिक शुभेच्छा

आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ विचारवंतः संपादक: धम्मरत्न आंतरराष्ट्रीय पुरस्कार 1ले महाराष्ट्रीयन मानकरी काशिराम जी पैठणे यांना 69 व्या वाढदिवसानिमित हार्दिक शुभेच्छा


ज्येष्ठ पत्रकार, विचारवंत आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ नेते, धम्म प्रचारक, महाराष्ट्र राज्य भारतीय कर्मचारीमजदूर युनियन चे उपाध्यक्ष, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या डेमॉक्रॅटिक गटाचे राज्य संघटक बुद्ध धम्माचा देशविदेशात प्रसार, प्रचारात अग्रेसर असणारे मा. काशिराम जी पैठणेसाहेब आज आपल्या वाढदिवसाच्या दिवशी हार्दिक शुभेच्छा देण्यासाठी व आपले अभिनंदन करण्यासाठी आपल्या व्यक्तीमत्वाने आमचे जीवन सफल झाले आहे. त्यासंदर्भात आपल्या व्यक्तीमत्वाने मी व्यक्तीगत प्रभावीत झालो वास्तविक पाहता पैठणे साहेब यांच्याशी गेल्या 10वर्षापासून माझे जिव्हाळ्याचे मैत्रीपूर्ण संबंध काशिराम पैठणे साहेब यांचा जन्म दि. 6/04/1953 रोजी बुलढाणा जिल्हयातील देऊळ गाव राजा तालुक्यातील धोतरानंदई या खेडेगावी माता यमुनाबाई व पिता गोविंदराव यांच्या पोटी झाला. त्यांच्या मातृभूमीतच त्यांच्या वर आईवडिलांकडून सर्वधर्मसमभावाचे बाळकडू त्यांच्या अंगी जोपासना करण्याच्या कामी धार्मिकतेचे शिक्षण त्यांना मिळाले. पैठणे साहेब यांचे प्राथमिक शिक्षण इ.1ली ते 4थी धोतरानंदई ता. देऊळगाव राजा जि. बलढाणा येथे झाले. इ.5 वी ते 10वी पर्यंतचे शिक्षण घेण्यासाठी आई वडीलांनी श्री शिवाजी विद्यालय देऊळ गाव महि. जि. बुलढाणा येथे अपार कष्ट घेतले. विद्यार्थी जीवनापासून पैठणे साहेब यांच्या वरती विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या "शिका"" संघटीत व्हा" आणि "संघर्ष करा या तत्वज्ञानाचा प्रभाव पडला होता. त्यादृष्टीने 1971रोजी दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली होती. अशा वेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या पीपल्स एज्युकेशन सोसायटी मुंबई येथे 11वी 12वी शिक्षण पूर्ण केले. घरची परीस्थिती बेताची असल्याने पैठणे साहेब यांनी पोलिस दलात नोकरी करण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली पोलीस अधिकारी म्हणून राज्याच्या अनेक भागात ईमानदारीत नोकरी करण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली होती एक निष्ठावंत पोलिस अधिकारी आणि वेगवेगळ्या ठिकाणी घेतलेला निर्णयाची अंमलबजावणी समाजाभिमुख कशी होईल यासाठी पैठणे साहेब यांनी अद्वैतीय योगदान दिले आहे. मला लुम्बिनी नेपाळ येथे 2017 रोजी त्यांच्या सहवासात राहायला येण्याचा योग मिळाला. भगवान बुद्धाच्या पवित्र जन्म स्थानाचे लुम्बिनी येथे नेपाळ मध्ये मला बुद्धवंदना म्हणून सादर करण्याचेही भाग्य मला मिळाले. पैठणे साहेब यांच्या धम्मरत्न आंतरराष्ट्रीय पुरस्कार सोहळ्याच्या निमिताने मला नेपाळ येथे जाण्याचा पुन्हा योग आला परंतु पैठणे साहेब यांच्या अनुपस्थितीमुळे मला खूपच वेदना झाल्या होत्या. पैठणे साहेब हेच माझे सर्वात मोठे आदर्श त्याच्या व्यक्तीमत्वाने आमचे जीवन सफल झाले आहे. मा. काशिराम जी पैठणे साहेब यांच्या वरती विश्लेषण कितीही वेळा लिहिले तरी ते कमीच पडेल. काशिराम पैठणे यांनी ठाणे व नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात अत्यंत प्रामाणिकपणे पोलिस दलात नोकरी केली.


तसेच बाहेरच्या राज्यात व परदेशात सुद्धा ईमानदारीने सेवा केली. काशिराम पैठणे यांच्यावर तथागत गौतम


बुद्ध व महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन कार्याचा विद्यार्थी दशेत प्रभाव पडला होता. काशिराम


पैठणे साहेब यांनी पाक्षिक आम्रपाली, सा. सदैव जागृत. सा. खारघर ग्रीन सिटी टाईम्स. सा. अथांग वादळ या वृत्तपत्रातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशासाठी केलेल्या योगदानाबाबत लेख लिहिले आहेत. काशिराम पैठणे योनी तथागत गौतम बुद्ध डॉ. बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले, राजश्री शाहू महाराज, लोकशाहिर आण्णा भाऊ साठे यांचे महान विचार आपल्या लेखणीतून प्रबोधनातून प्रत्यक्ष भारत व परदेशात सुद्धा समाजाभिमुख विचार पोहचवण्यासाठी अद्वैतीय योगदान दिले आहे. काशिराम पैठणे यांनी संपूर्ण भारतात अन्याय अत्याचाराविरुद्ध लढा देऊन दलित, पिढीत वंचित शोषित यांना न्याय मिळवून देण्यासाठी भरीव योगदान दिले आहे. यावेळी काशिराम पैठणे यांनी जीवाची पर्वा न करता अनेक संकटाला सामोरे जावे लागले आहे. तथागत बुद्ध कालीन अहर्त मिखुणी उदा अहर्त भिखुणी माता महाप्रजापती गौतमी भिखखुणी माता यशोधरा भद्रा कात्यायनी किसा गौतमी सुप्रिया भिगारमाता विशाखा सामावती आम्रपाली उत्तरानंद माता यांच्या कर्तृत्वावर 2000 पेक्षा जास्त प्रवचने दिली आहेत. काशिराम पैठणे हे 2017 या वर्षापासून बुलढाणा जिल्हयातील चिखली तालुक्यातील खामखेड या गावी डॉ. बाबासाहेब आंबेडकरजयंती, महापरीनिर्वाण दिन संविधान दिन


सोहळ्याचे आयोजन संविधानात्मक व्याख्याने पम्मावर प्रवचने देऊन : भारतीय संविधान रॅली ये दरवर्षी आयोजन करण्यात पैठणे साहेब यांचा सिंहाचा वाटा असून महत्वाचे योगदान धम्मकार्यात देत आहेत.


त्यांना नॅशनल युथ अवारडीज फेडरेशन ऑफ इंडिया आणि विशाखा वेलफियर सोशिल फाऊंडेशन नवी दिल्ली महाराष्ट्र सदनच्या प्रेस हॉलमध्ये दि. 9 मार्च 2022 केंद्रीय वित्त राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्या हस्ते भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय एक्सलन्स अवार्ड प्रदान करण्यात आला जागतिक महिला दिन सोहळ्याच्या निमिताने देशातील मान्यवर 55 महिलांचा नॅशनल वेमेन्स अचीवर अॅवार्ड यावेळी प्रदान करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहणे म्हणून राष्ट्रीय मानव अधिकार आयोग सदस्य डॉ. ज्ञानेश्वर म.मुळे. महिला आयोग अध्यक्षा रेखा शर्मा, दिल्ली मायनॉरिटी कमिशनच्या सदस्या नॅन्शी बारलो, डीडब्ल्यूबीडीएनसी, मिनीस्ट्री आफ सोशिल जस्टीस अॅड इमपावरन्टमेंट चेअरमन भिकू (दादा) रामजी इदाते, नॅशनल युथ अवारडीज फेडरेशन ऑफ इंडिया व डॉ. विशाखा वेलफियर सोशिल फाऊंडेशनचे अध्यक्ष व संत गाडगे बाबा विद्यापीठाचे राज्यपालनामित सिनेट सदस्य डॉ. मनिष गवई दिल्ली आदी मान्यवर व्यक्ती व संस्थांचे प्रतिनिधी हजर होते. काशिराम पैठणे बुलढाणा हे सिनियर आबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ नेते आणि विचारवंत, लेखक, संपादक असून त्यांनी बुद्ध धम्माच्या प्रसार व प्रचार कार्याची बांधिलकी जोपासण्याचे पवित्र कार्य करण्याचे अद्वैतीय योगदान


दिले आहे. साहेब आज आपला 67वा वाढदिवस आहे. आपल्या सामाजिक कार्याची दखल घेवून आजपर्यंत


आपणास 4वेळा आंतरराष्ट्रीय व 19वेळा देशविदेशातील मान्यवर व्यक्ती व संस्थांचे प्रतिनिधी यांच्या


माध्यमातून मान्यताप्राप्त संस्थांचे राष्ट्रीय पुरस्कार प्रदान आपणास करण्यात आले. विविध विषयांवर विचार


करून आपण अनेक मान्यवर व्यक्ती व संस्थांचे प्रतिनिधी म्हणून आज काम पहात आहात


आपल्या बद्दल आदर आम्ही बाळगून आहोत.


आपण सामाजिक व शैक्षणिक समुपदेशन करणारे जाणकार आंबेडकरी चळवळी ये ज्येष्ठ विचारवंत व नेते आहात. काशिराम पैठणे साहेब यांच्या पत्रकारितेच्या अद्वतीय योगदानबद्दल दिल्ली येथील बाबू जनजीवन राम कला संस्कृती तथा साहित्य अकादमीचे वतीने दिला जाणारा दि बेस्ट जर्नालिस्ट नॅशनल पुरस्कार त्यांच्या सामाजिक कार्याची दखल अकादमीच्या वतीने घेतली असून त्यांनी भारत नेपाळ दलित मैत्री संघ काठमांडू नेपाळ या संस्थेच्या माध्यमातून दिला जाणारा धम्मरत्न आंतरराष्ट्रीय पुरस्कार 2021 भगवान बुद्धाच्या पवित्र जन्म स्थानी लुम्बिनी नेपाळ येथे राजकीय बुद्ध विहार येथे मान्यवरभदन्त मिळणी संघ यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रीय पुरस्कार प्रदान समिती प्रमुख डॉ. नफेसिंह खोबाजी दिल्ली उपस्थित होते.


आपणास 69व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा व हार्दिक अभिनंदन केले जात आहे. साहेब शतायुषी व्हा. Many many happy returns of the day of your 69th birthday Anniversary.


HAPPY BIRTHDAY TO YOU SIR


नमो बुद्धाय जय भीम सर


प्रा.गोरख साठे सर


बारामती


मो. 9833661268

Popular posts
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर जयंती साजरी
Image
उरण तालुक्यात शेकापक्षाला पुन्हा नवी उभारी येणार.-पक्षाच्या उरण तालुका चिटणीस पदावर कामगार नेते रवि घरत यांची नियुक्ती
Image
पनवेल महानगरपालिका विद्युत विभाग प्रमुख प्रितम पाटील यांच्या तत्परतेने पेंधर येथील मोठी दुर्घटना टळली
Image
तळोजा एमआयडीसीतील प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर आमदार प्रशांत ठाकूर यांची उद्योगमंत्र्यांकडे रासायनिक व मत्स्यप्रक्रिया उद्योगांचे स्थलांतर करण्याची मागणी
Image
जहांगीर आर्ट गॅलरीत चित्रकार बी.महाजन,एस.तांबटकर व रसिका महाजन यांच्या चित्रांचे प्रदर्शन संपन्न
Image