श्री धूतपापेश्वर लिमिटेड कंपनीच्या खांदा कॉलनी प्लांटमध्ये बेकायदा झाडांची कत्तल-परवानगी न घेता कंपनीतील करंजाची झाडे तोडली

श्री धूतपापेश्वर लिमिटेड कंपनीच्या खांदा कॉलनी प्लांटमध्ये बेकायदा झाडांची कत्तल-परवानगी न घेता कंपनीतील करंजाची झाडे तोडली


पनवेल / प्रतिनिधी : पनवेल महानगर पालिका हद्दीतील खांदा कॉलनी येथील नामांकित श्री धूतपापेश्वर लिमिटेड कंपनीच्या प्लांटमध्ये असलेली करंजाची झाडे तोडण्यात आली असून कोणतीही कायदेशीर परवानगी न घेता या झाडांची कत्तल करण्यात आली असल्याची माहिती मिळत आहे. जगभरात विकासाच्या नावाखाली अनेक जंगले तोडली जात आहेत. ज्यांचे गंभीर परिणाम जाणवायला लागले आहेत. आज सर्व डोंगर, जंगल हे वृक्षतोडीमुळे ओसाड झाले आहेत. औषधीयुक्त वनस्पतींची दुर्मिळता झाली आहे. त्यामुळे पाऊससुद्धा पडत नाही. ज्या प्रमाणात तोड होते त्या प्रमाणात लागवड न झाल्याने निसर्गाच्या या मौल्यवान संपत्तीचा फार मोठा र्‍हास होत आहे, जो जैविक आणि पर्यावरणाचे संतुलन बिघडवत आहे. दगडांच्या खाणींमुळे डोंगरमाथेही उजाड होत आहेत अन् जवळच्या भागातील पर्जन्यमान कमी होत आहे. ‘एक वृक्ष तोडल्याने अंदाजे १७ लाख रुपयांचा तोटा होतो. पनवेल तालुक्यात सध्या अनेक ठिकाणी झाडांची कत्तल स्वतःच्या फायद्यासाठी केली जात आहे. नुकतेच श्री धूतपापेश्वर लिमिटेड कंपनीच्या प्लांटमध्ये कंपनीच्या व्यवस्थापनाने महावितरण कर्मचाऱ्यांच्या मदतीने दोन झाडाची विनापरवानगी तोडणी केली जात होती. शासकीय परवानगी नसताना झाडे का तोडली त्याबद्दल संबंधितांना विचारणा केली असता धूतपापेश्वर कंपनीचे जगताप याणी सांगितले कि आम्ही हि झाडे तोडली नाहीत महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी आम्हाला शासकीय परवानगी लागते हे सांगितले नाही त्यामुळे आम्ही झाडे तोडलेले आहेत असे सांगितले. दरम्यान विनापरवानगी झाडांची कत्तल करणे हा गुन्हा असून त्यांच्यावर महाराष्ट्र दंड विधान अनुसार त्यांच्यावर जंगल कायदा कलम नुसार तसेच महाराष्ट्र (नागरी क्षेत्रे) झाडांचे संरक्षण व जतन अधिनियम 1975 अन्वये गुन्हा दाखल करून कारवाई करावी अशी मागणी निसर्गप्रेमी व संघटनांनी केली आहे.


कोट : 

पत्र दिल्यानंतर आम्हाला महावितरणने सांगितले की झाडे तोडण्यासाठी आमच्याकडे माणसे नसतात तेव्हा तुम्हाला तुमची व्यवस्था करावी लागेल.  

सदर लाईन ही उच्च दाबाची असल्याने वारंवार शट डाऊन घेतले जात नाही. शटडाऊन घेण्याच्या आगोदर एक दिवस आपल्याला सांगण्यात येईल 

त्याप्रमाणे दिनांक २१/२/२०२२रोजी महावितरणचे श्री रूपनवर व त्यांचे दोन सहाय्यक आम्हाला उद्या शट डाऊन असल्याने आपण झाडे तोडायची व्यवस्था करण्यास सांगितले. दिनांक २२/२/२०२२ रोजी सकाळी ११वाजता श्री रुपणवर व इतर दोघे आल्यावर त्यांच्या . उपस्थितीत झाडांची छाटणी जमिनीपासून १५ फुटाच्या वर  केली. त्यावेळी महावितरणच्या लोकांनी यासाठी शासकीय परवानगी घ्यावी लागते याबाबत काहीही सांगितले नाही . जर त्याचवेळी त्यांनी आम्हास  तशी कल्पना दिली असती तर आम्ही त्याचवेळी ह्याच पत्राची प्रत इतर आवश्यक त्या कार्यालयात दिली असती.

कोट : 

आम्हाला दिलेल्या पत्रानुसार आम्ही फक्त शटडाऊन करण्यासाठी कर्मचारी पाठवले होते. झाडे तोडण्यासाठी आम्ही कोणतीही महावितरणची माणसे पाठवली नव्हती. त्याबाबद्दल आम्हाला काहीही  माहीत नाही कंपनीने झाडे तोडलेली आहेत. 

श्री. रूपनवर महावितरण खांदा कॉलनी.

Popular posts
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर जयंती साजरी
Image
उरण तालुक्यात शेकापक्षाला पुन्हा नवी उभारी येणार.-पक्षाच्या उरण तालुका चिटणीस पदावर कामगार नेते रवि घरत यांची नियुक्ती
Image
तळोजा एमआयडीसीतील प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर आमदार प्रशांत ठाकूर यांची उद्योगमंत्र्यांकडे रासायनिक व मत्स्यप्रक्रिया उद्योगांचे स्थलांतर करण्याची मागणी
Image
पनवेल महानगरपालिका विद्युत विभाग प्रमुख प्रितम पाटील यांच्या तत्परतेने पेंधर येथील मोठी दुर्घटना टळली
Image
जहांगीर आर्ट गॅलरीत चित्रकार बी.महाजन,एस.तांबटकर व रसिका महाजन यांच्या चित्रांचे प्रदर्शन संपन्न
Image