जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या संकल्पनेतून खालापूर तालुक्यात वावोशी मंडळात “आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण” शिबिराचे आयोजन
अलिबाग,दि.02 (जिमाका):- जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या संकल्पनेतून आपत्ती व्यवस्थापन जनजागृती अभियानांतर्गत कर्जत उपविभागीय अधिकारी श्री.अजित नैराळे, खालापूर तहसिलदार श्री.आयुब तांबोळी, यांच्या पुढाकारातून वावोशी मंडळातील ग्रुप ग्रामपंचायत नारंगी येथे आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या प्रशिक्षण शिबिरात शिबिरार्थींना प्रथमोपचार, आपत्ती व्यवस्थापन आदी विषयांबाबत प्रशिक्षण देण्यात आले.
यावेळी स्थानिकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदविला. या शिबिरास मंडळ अधिकारी वावोशी, तलाठी सजा नारंगी, सरपंच, उपसरपंच व ग्राम विकास अधिकारी, ग्रुप ग्रामपंचायत नारंगी स्थानिक लोकप्रतिनिधी उपस्थित होते. हे शिबीर तहसील कार्यालय खालापूर व उपनियंत्रक, नागरी संरक्षण दल, उरण यांच्या संयुक्त विद्यमाने व ग्रुप ग्रामपंचायत नारंगी यांच्या सहकार्याने यशस्वीरित्या पार पडले.