सा.रायगड पनवेलचे संपादक संतोष भगत यांचा वाढदिवस आबोली रिक्षा चालक महिलांकडून साजरा

सा.रायगड पनवेलचे संपादक संतोष भगत यांचा वाढदिवस आबोली रिक्षा चालक महिलांकडून साजरा


पनवेल (प्रतिनिधी)- अबोली महिला रिक्षा चालक संघटनेचे संस्थापक पत्रकार संतोष भगत यांचा वाढदिवस महिला रिक्षा चालक यांनी साजरा केला गेली अनेक वर्ष पत्रकारीतेत पनवेल मध्ये वेगळी छाप पाडत, संतोष भगत हे अन्यायाला वाचा फोडत अनेकांना न्याय मिळून दिला आहे. पनवेल शहरात महिला रिक्षा आल्या परंतु रिक्षा व्यवसाय कारणास महिलांना खूप अडचणी येत होत्या,रिक्षा व्यवसाय करण्यास नाका नाक्यावर महिलांना विरोध होत होता ही बाब पत्रकार संतोष भगत व पहिल्या रिक्षा महिला चालक सौ. शालिनी गुरव यांच्या लक्षात आली त्यांनी अबोली महिला रिक्षा चालक संघटनाची स्थापना करून रिक्षा महिला चालकांच्या पाठीशी खंबीर पणे उभा राहिले,आर टी ओ ला पाठपुरावा करून महिला रिक्षा नाका मिळून दिला त्या मुळे महिला रिक्षा चालक व्यवसाय करतआहे असे मत संघटण्याच्या खजिनदार यांनी मांडले वाढदिवसाच्या प्रसंगी अनेकरिक्षा चालक महिला उपस्थित होत्या केक कापून वाढदिवस साजरा केला. संतोष भगत यांनी वाढदिवसा निमित्त महिला रिक्षा चालकांच्या अडचणीला संघटना सतत पाठीशी असेल असे सांगिले या वेळी संघटनेच्या उपाध्यक्षा. सौ. सुलोचना भगत तसेंच सौ.ललिता राऊत, सौ.सीमा नरवडे,सौ.मनीषा देशमुख, आश्विनी शितोळे,आनीता पाटील,सौ.सुनीता जाधव, सौ.वर्षा राजगुडे,सौ.कमल घोलप,सौ.आनीता डावरे,सौ.वर्षा धरने,सौ.मंगल पाटील,सौ.सूनिता पवार सौ.ऋुषाली रोडगे अदी उपस्थित होते.