जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या संकल्पनेतील “गरुडझेप” स्पर्धा परिक्षा केंद्र अभ्यासिकेचे म्हसळा सार्वजनिक वाचनालय येथे उद्घाटन संपन्न

जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या संकल्पनेतील “गरुडझेप” स्पर्धा परिक्षा केंद्र अभ्यासिकेचे म्हसळा सार्वजनिक वाचनालय येथे उद्घाटन संपन्न


     *अलिबाग, दि.30 (जिमाका):-* म्हसळा येथील सार्वजनिक वाचनालय येथे जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या संकल्पनेतील “गरुडझेप” स्पर्धा परिक्षा केंद्राच्या अभ्यासिकेचे उद्घाटन आज करण्यात आले.

     या कार्यक्रमाला स्पर्धा परिक्षेचा अभ्यास करणारे विद्यार्थी व विद्यार्थीनी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. या कार्यक्रमात म्हसळा तहसिलदार श्री.समीर घारे, महसूल नायब तहसिलदार श्री.डी.जे.पाटील, प्राचार्य श्री.मोरे, ग्रंथपाल श्री.मशाळे, सरपंच श्री.पवार, पोलीस उपनिरीक्षक श्रीमती वर्षा बोरसे, विद्यार्थिनी कु.प्राची माळी, श्री.सुनिल उमरठकर यांनी “गरुडझेप” स्पर्धा परिक्षेबाबत मार्गदर्शन केले व म्हसळा तालुक्यातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी मार्गदर्शन केंद्राचा व अभ्यासिकेचा लाभ घ्यावा, असे आवाहन तहसिलदार श्री.समीर घारे यांनी केले.



Popular posts
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर जयंती साजरी
Image
उरण तालुक्यात शेकापक्षाला पुन्हा नवी उभारी येणार.-पक्षाच्या उरण तालुका चिटणीस पदावर कामगार नेते रवि घरत यांची नियुक्ती
Image
तळोजा एमआयडीसीतील प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर आमदार प्रशांत ठाकूर यांची उद्योगमंत्र्यांकडे रासायनिक व मत्स्यप्रक्रिया उद्योगांचे स्थलांतर करण्याची मागणी
Image
पनवेल महानगरपालिका विद्युत विभाग प्रमुख प्रितम पाटील यांच्या तत्परतेने पेंधर येथील मोठी दुर्घटना टळली
Image
जहांगीर आर्ट गॅलरीत चित्रकार बी.महाजन,एस.तांबटकर व रसिका महाजन यांच्या चित्रांचे प्रदर्शन संपन्न
Image