करंजाडेतील जेष्ठ नागरिक पंढरीच्या दर्शनाला-सरपंच रामेश्वर आंग्रे यांचा पुढाकार


करंजाडेतील जेष्ठ नागरिक पंढरीच्या दर्शनाला-सरपंच रामेश्वर आंग्रे यांचा पुढाकार  


पनवेल - साधू संत येति घरा, तोचि दिवाळी दसरा या अभंगांनुसार आळंदी- पंढरपूर आषाढी पायी वारीसाठी जाणाऱ्या वैष्णवजणांचे पाय आपल्या घराला लागावेत म्हणून पंढरीच्या वाटेवरील भाविक व भक्तगण आतुरलेले असतात. गेल्या वर्षी कोरोनामुळे वर्षानुवर्षे पायी वारी करण्याची वारकऱ्याची परंपरा खंडित झाल्याने वारकरी भक्तांसह गावोगावचे भाविकभक्त माफ कर पंढरीनाथा यंदा दुरूनच दर्शन घेतले. मात्र आता कोरोना कमी झाल्याने भक्तगणांची दर्शनाला गर्दी होत आहे. त्यानुसार शनिवारी 12 रोजी करंजाडे ग्रामपंचायतीचे सरपंच रामेश्वर आंग्रे यांनी करंजाडे वसाहतीतील सुमारे 80 जेष्ठ नागरिकांना मोफत पंढरपूर, श्री क्षेत्र अक्कलकोट, तुळजापूर येथे दर्शनाला पाठविण्यात आले. यावेळी जेष्ठ नागरिकांनी विठ्ठलरुपी रामेश्वर आला असल्याची प्रतिक्रिया दिली.

        महाराष्ट्राचे धार्मिक अधिष्ठान पंढरपूरला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून वारकरी सांप्रदाय विविध मंडळे पायी वारी करीत खांद्यावर हरी पताका घेऊन विठ्ठलनामासह ज्ञानोबा माउली तुकाराम असे नामस्मरण करीत पंढरीची वारी करीत असतात. यामध्ये नवी मुंबई, उरण, पनवेल परिसरातून अनेक दिंड्या विठ्ठलाच्या दर्शनासाठी परिसरातून जाणाऱ्या पालख्या न चुकता विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरीकडे निघतात. यामध्ये गव्हाण कोपर, उरण ते पंढरपूर, वाशी ते पंढरपूर, कोपर खैरणे  ते पंढरपूर, मुंबई ते पंढरपूर, घणसोली ते पंढरपूर, उलवा ते पंढरपूर, विठ्ठलवाडी ते पंढरपूर यासह अनेक दिंड्या, पालख्याचा समावेश आहे. या दिंड्यांमध्ये वारकरी असतील, सहाशे किंवा तीनशे दिंडीकरी असतात. सध्याही ही सेवा सुरू आहे. मात्र गेल्या वर्षी करोनामुळे यंदा भीषण परिस्थिती निर्माण झाली होती. यामुळे नवी मुंबई, पनवेल परिसरातील अनेक दिंड्या पालख्याची रद्द केल्या होत्या. त्यामुळे वारकऱयांनी दुःखदायक प्रतिक्रिया व्यक्त केल्या होत्या. याज भावनेतून नेहमी सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे करंजाडे ग्रामपंचायतीचे सरपंच रामेश्वर आंग्रे यांनी आपल्या परिसरातील जेष्ठ नागरिकांना विठ्ठलाच्या दर्शनाला नेण्याचे नियोजन केले होते. याचबरोबर श्रीक्षेत्र अक्कलकोट, व तुळजापूर 12 ते 14 मार्च रोजी दोन 80 सीटर बस बुकिंग करून वसाहत गावातील सुमारे 80 जेष्ठ नागरिकांना पंढरपूरला नेत पंढरपूर, अक्कलकोट, व तुळजापूर ला दर्शनासाठी रवाना झाले आहेत. त्यामुळे जेष्ठ नागरिक व वसाहतीतील नागरिकांनी विठ्ठलरुपी रामेश्वर आला अशी प्रतिक्रिया जेष्ठ नागरिकांनी बोलताना दिली.

Popular posts
लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त भव्य विज्ञान प्रयोग प्रदर्शन स्पर्धेचे आयोजन
Image
आमदार विक्रांत पाटील यांना महाराष्ट्र प्रदेश निवडणूक संचालन समितीमध्ये 'राज्य निवडणूक समन्वयक' म्हणून विशेष जबाबदारी!
Image
ठाणे आणि विटावा परिसरात "जनसभा" दिवाळी विशेषांकाचे प्रकाशन आणि वितरण
Image
डॉ. नंदकुमार मारुती जाधव फाउंडेशन संचालित बौद्धिक अक्षम मुलांच्या विशेष शाळेत बालदिन उत्साहात साजरा
Image
८०० ग्रॅम वजनाच्या अकाली जन्मलेल्या बाळाची मृत्यूशी झुंज यशस्वी-नवी मुंबईतील मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये यशस्वी उपचार
Image