भारत निवडणूक आयोगाची मतदार जागृती स्पर्धा सुरू "माझे मत माझे भविष्य.. एका मताचे सामर्थ्य

                                                                

भारत निवडणूक आयोगाची मतदार जागृती स्पर्धा सुरू "माझे मत माझे भविष्य.. एका मताचे सामर्थ्य


*पाच प्रकारच्या स्पर्धा; प्रवेशिका स्वीकारण्याची मुदत 15 मार्च 2022 पर्यंत*

         सर्जनशील माध्यमातून प्रत्येक मताचे महत्व पटवून देण्यासाठी भारत निवडणूक आयोगाने 2022 च्या राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त “माझे मत, माझे भविष्य एका मताचे सामर्थ्य” ही राष्ट्रीय मतदार जागृती स्पर्धा सुरू केली आहे. SVEEP (Systematic Voters' Education and Electoral Participation) मतदारांचे पद्धतशीर शिक्षण आणि सहभाग कार्यक्रमांतर्गत राष्ट्रीय मतदार जागृती स्पर्धा आयोजित करून निवडणूक आयोग सामान्य लोकांच्या प्रतिभा आणि सर्जनशीलतेचा वापर करून त्यांच्या सक्रिय सहभागातून लोकशाही बळकट करीत आहे. यामध्ये सर्वांना सहभागी होता येणार आहे.    

        सामूहिक सहभागातून लोकशाहीतील प्रत्येक मताचे महत्व विशद करण्याच्या मध्यवर्ती संकल्पनेवर आधारित कल्पना व मजकूरांचा गौरव करणे, हा यामागील उद्देश आहे.

1) मध्यवर्ती संकल्पना: माझे मत, माझे भविष्य - एका मताचे सामर्थ्य

2) राष्ट्रीय स्तरावरील या स्पर्धेत एकूण 5 प्रकारच्या स्पर्धा होत आहेत. प्रश्नमंजूषा स्पर्धा, घोषवाक्य स्पर्धा, गीत स्पर्धा, व्हिडिओ मेकिंग स्पर्धा आणि भित्तीचित्र स्पर्धा. 

*प्रश्नमंजुषा स्पर्धा-*     

        प्रश्नमंजुषा स्पर्धा ही जिज्ञासू मनांना सहभागी करून त्यांची निवडणुकीबाबतची जागरूकता पातळी जाणून घेण्याचा प्रयत्न आहे. या स्पर्धेमध्ये 3 स्तर असतील (सुलभ, मध्यम आणि अवघड). स्पर्धेच्या तीनही स्तरांची पूर्तता केल्यास सर्व सहभागींना ई-प्रमाणपत्र प्रदान करण्यात येईल. 

*घोषवाक्य स्पर्धा-* 

       या स्पर्धेत सहभागी व्हा आणि दिलेल्या मध्यवर्ती संकल्पनेवर तुमचे शब्द गुंफून इतरांना प्रेरणा देण्यासाठी आकर्षक घोषवाक्य तयार करा.

*गीत स्पर्धा-* 

          शास्त्रीय, समकालीन आणि रॅप इत्यादीसह कोणत्याही स्वरूपातील गीताच्या माध्यमातून स्पर्धकाच्या सर्जनशील मनाची प्रतिभा आणि क्षमता जोखणे, हे या स्पर्धेचे उद्दिष्ट आहे. सहभागी स्पर्धक दिलेल्या मध्यवर्ती संकल्पनेवर मूळ गीतरचना तयार आणि शेअर करू शकतात. कलाकार आणि गायक त्यांच्या आवडीचे कोणतेही वाद्य वापरू शकतात. गाण्याचा कालावधी तीन मिनिटापेक्षा जास्त नसावा.

*व्हिडिओ मेकिंग स्पर्धा-* व्हिडिओ मेकिंग स्पर्धेतून कॅमेराप्रेमींना भारतीय निवडणुकांचा उत्सव आणि त्यातील विविधता साजरी करणारा व्हिडिओ (चित्रफीत) तयार करण्याची संधी मिळते. स्पर्धेच्या मुख्य विषयाव्यतिरिक्त, पुढील विषयावरदेखील सहभागी स्पर्धक व्हिडिओ बनवू शकतात- माहितीपूर्ण आणि नैतिक मतदानाचे महत्व (प्रलोभनमुक्त मतदान); मतदानाची शक्ती महिला, दिव्यांग व्यक्ती ज्येष्ठ नागरिक, तरुण आणि नवीन मतदारांसाठी मतदानाचे महत्त्व प्रदर्शित करणे, सहभागी स्पर्धकांना वरीलपैकी कोणत्याही एका विषयावर केवळ एक मिनिट कालावधीचा व्हिडिओ करायचा आहे. व्हिडिओ गाणे आणि घोषवाक्य स्पर्धेसाठी प्रवेशिका भारतीय राज्यघटनेच्या आठव्या अनुसूचीनुसार कोणत्याही अधिकृत भाषेत दिल्या जाऊ शकतात.

*भित्तीचित्र स्पर्धा:* 

      वरील मध्यवर्ती संकल्पनेवर आधारित आणि विचारप्रवर्तक अशी भित्तीचित्रे तयार करू शकणाऱ्या चित्रकार आणि कलाप्रेमींसाठी ही स्पर्धा आहे. सहभागी स्पर्धक डिजिटल भित्तीचित्र, आरेखन किंवा रंगवलेली भित्तीचित्रे पाठवू शकतात. भित्तीचित्रांचे रेझोल्यूशन (रंगकणांचे पृथक्करण) चांगले असले पाहिजे.

*स्पर्धा श्रेणी:-*

*संस्थात्मक श्रेणी-*     

         शाळा, महाविद्यालये, विद्यापीठे अशा केंद्र किंवा राज्य सरकारच्या संबंधित कायद्यांतर्गत नोंदणीकृत संस्थांना या संस्थात्मक श्रेणीमध्ये भाग घेता येईल.

*व्यावसायिक श्रेणी-* 

      ज्या व्यक्तीचा उदरनिर्वाहाचा मुख्य स्त्रोत गायन/व्हिडिओ मेकिंग/भित्तीचित्र असा आहे किंवा गायन/व्हिडिओ मेकिंग/भित्तीचित्र याच्याशी संबंधित एखादे काम हा जिच्या उत्पन्नाचा प्रमुख स्रोत आहे, अशी व्यक्ती व्यावसायिक म्हणून गणली जाईल. निवड झाल्यास, सहभागी स्पर्धकाला व्यावसायिक श्रेणी सिद्ध करण्यासाठी प्रमाणपत्र सादर करावे लागेल.

*हौशी श्रेणी-* 

      हौशी- जी व्यक्ती गायन/व्हिडिओ मेकिंग/भित्तीचित्र हा छंद म्हणून, सृजनाची आस म्हणून करते, परंतु तिच्या/ त्याच्या उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत इतर कोणत्या तरी माध्यमांतून असतो तिला 'हौशी' म्हणून गणण्यात येईल.

*पुरस्कार आणि सन्मान:-*

          गीत स्पर्धा, व्हिडिओ मेकिंग स्पर्धा आणि भित्तिचित्रे स्पर्धांचे तीन श्रेणींमध्ये वर्गीकरण केले आहे. संस्थात्मक, व्यावसायिक आणि हौशी. प्रत्येक श्रेणीतील पहिल्या तीन विजेत्यांना आकर्षक रोख पारितोषिके दिली जातील. याव्यतिरिक्त, प्रत्येक श्रेणीला विशेष उल्लेखनीय रोख पारितोषिके दिली जातील. संस्थात्मक श्रेणीमध्ये 4 विशेष उल्लेखनीय तर व्यावसायिक आणि हौशी श्रेणीसाठी 03 विशेष उल्लेखनीय पारितोषिके दिली जातील.

*गीत स्पर्धा व त्यासाठीची बक्षिसे-*

*संस्थात्मक श्रेणी-* 

        पहिले बक्षीस-रु.1 लाख, दुसरे बक्षीस- रु.50 हजार, तिसरे बक्षीस-रु.30 हजार आणि विशेष उल्लेखनीय बक्षीस- रु.15 हजार. 

*व्यावसायिक श्रेणी-* 

       पहिले बक्षीस-रु.50 हजार, दुसरे बक्षीस- रु.30 हजार, तिसरे बक्षीस-रु.20 हजार आणि विशेष उल्लेखनीय बक्षीस- रु.10 हजार. 

*हौशी श्रेणी-* 

      पहिले बक्षीस-रु.20 हजार, दुसरे बक्षीस- रु.10 हजार, तिसरे बक्षीस-रु.7 हजार 500 आणि विशेष उल्लेखनीय बक्षीस- रु.3 हजार. 

*व्हिडीओ मेकींग स्पर्धा व त्यासाठीची बक्षिसे-*

*संस्थात्मक श्रेणी-* 

        पहिले बक्षीस-रु.2लाख, दुसरे बक्षीस- रु.1 लाख, तिसरे बक्षीस-रु.75 हजार आणि विशेष उल्लेखनीय बक्षीस- रु.30 हजार. 

*व्यावसायिक श्रेणी-* 

         पहिले बक्षीस-रु.50 हजार, दुसरे बक्षीस- रु.30 हजार, तिसरे बक्षीस-रु.20 हजार आणि विशेष उल्लेखनीय बक्षीस- रु.10 हजार. 

*हौशी श्रेणी-* 

       पहिले बक्षीस- रु.30 हजार, दुसरे बक्षीस- रु.20 हजार, तिसरे बक्षीस-रु.10 हजार आणि विशेष उल्लेखनीय बक्षीस- रु.5 हजार. 

*भित्तीचित्र स्पर्धा व संबंधित बक्षिसे-:*

*संस्थात्मक श्रेणी-* 

      पहिले बक्षीस-रु.50 हजार, दुसरे बक्षीस- रु.30 हजार, तिसरे बक्षीस-रु.10 हजार आणि विशेष उल्लेखनीय बक्षीस- रु.10 हजार. 

*व्यावसायिक श्रेणी-*

        पहिले बक्षीस-रु.30 हजार, दुसरे बक्षीस- रु.20 हजार, तिसरे बक्षीस-रु.10 हजार आणि विशेष उल्लेखनीय बक्षीस- रु.5 हजार. 

*हौशी श्रेणी-* 

       पहिले बक्षीस-रु.20 हजार, दुसरे बक्षीस- रु.10 हजार, तिसरे बक्षीस-रु.7 हजार 500 आणि विशेष उल्लेखनीय बक्षीस- रु.3 हजार. 

*घोषवाक्य स्पर्धा:-* 

       प्रथम पारितोषिक- रू.20 हजार, द्वितीय पारितोषिक- रू.10 हजार, तृतीय पारितोषिक- रू.7 हजार 500. सहभागी होणाऱ्यांपैकी 50 स्पर्धकांना प्रत्येकी रु.2 हजार विशेष उल्लेखनीय पुरस्कार म्हणून देण्यात येतील.

*प्रश्न मंजुषा स्पर्धा:-*     

         विजेत्यांना भारतीय निवडणूक आयोगाचे नाव असलेल्या आकर्षक वस्तू देण्यात येतील. तसेच तिसरी पातळी पूर्ण करणाऱ्या सर्व स्पर्धकांना ई-प्रमाणपत्रे देण्यात येतील.

*ज्युरी:-* 

      विविध श्रेणींमधील प्रवेशिका भारत निवडणूक आयोगाद्वारे गठित परीक्षण मंडळाकडे पाठविण्यात येतील आणि विजयी प्रवेशिकांची निवड करण्यात येईल. पुनर्मूल्यांकनाच्या दाव्यांशी संबंधित विनंत्यांचा विचार केला जाणार नाही.

*कसे सहभागी व्हावे:-*

स्पर्धकांनी तपशिलवार मार्गदर्शक तत्त्वे, नियम आणि अटी यांच्या माहितीसाठी स्पर्धेचे संकेतस्थळ https://ecisveep.nic.in/contest/ येथे भेट यावी.

स्पर्धकांनी त्यांच्या प्रवेशिका सर्व तपशिलासह voter contest@eci.gov.in इथे ई-मेल कराव्यात.

ई-मेल करताना स्पर्धेचे नाव <स्पर्धा आणि <श्रेणी याचा विषयात उल्लेख करावा.

प्रश्नमंजूषा स्पर्धेत सहभागी होण्यासाठी स्पर्धकांनी स्पर्धा संकेतस्थळावर नोंदणी करावी.

सर्व प्रवेशिका दि.15 मार्च 2022 पर्यंत सहभागी स्पर्धकांच्या तपशिलांसह voter-contest@eci.gov.in या ईमेलवर पाठविण्यात याव्यात.

       अशा प्रकारे भारत निवडणूक आयोग भारतीय लोकशाहीबाबत तसेच मतदार जागृतीकरिता सर्वातोपरी प्रयत्नशील आहे. यादृष्टीने विविध उपक्रम राबवून जनतेमध्ये निवडणूक, मतदान याविषयीचे महत्व पटवून देण्यात येत आहे. आपणही या सार्वभौम भारताचे जबाबदार नागरीक म्हणून प्रशासनाकडून राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांमध्ये सक्रीय भाग घ्यावा आणि भारतीय लोकशाही बळकटीकरणाकरिता सहकार्य करावे, त्याचबरोबर दि.8 मार्च 2022 रोजी महिला दिनानिमित्त सकाळी 10.00 वा.पीएनपी नाट्यगृह अलिबाग येथे राज्यस्तरीय मतदार जागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमासाठी नागरिकांना मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर आणि उप जिल्हा निवडणूक अधिकारी श्रीमती स्नेहा उबाळे  यांनी केले आहे.


Popular posts
आमदार विक्रांत दादा पाटील यांच्या पुढाकाराने सिडकोच्या "माझ्या पसंतीचे घर" योजनेतील हजारो नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न!
Image
कळंबोली वहातुक शाखेकडून वाहन चालकांचे प्रबोधन
Image
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या उपनेतेपदी बबनदादा पाटील यांची नियुक्ती होताच शिवसैनिकांमध्ये उत्साह
Image
खारघर सेक्टर २० शहा किंग्डम येथील बांधकाम व्यावसायिकाकडून होत असलेल्या वायु व ध्वनी प्रदूषणापासून नागरिकांची सुटका करावी-सौ.नेत्रा पाटील
Image
गेल्या काही वर्षांपासून होणाऱ्या खांद्याच्या वेदनेपासून तिला मिळाला आराम;खारघरच्या मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये ६५ वर्षीय महिलेवर यशस्वी उपचार - दुर्बीणीद्वारे केली खांद्यांवर शस्त्रक्रिया
Image