परहूर येथील श्री समर्थ वृद्धाश्रमातील वृद्धांसाठी विविध शिबिरांचे आयोजन


परहूर येथील श्री समर्थ वृद्धाश्रमातील वृद्धांसाठी विविध शिबिरांचे आयोजन


अलिबाग,दि.20(जिमाका):- जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त अलिबाग तालुक्यातील मौजे परहूर येथील  "श्री समर्थ वृद्धाश्रम" येथील निराधार वृद्ध बांधवांसाठी आज अलिबाग तहसील कार्यालयाच्या पुढाकारातून आधार कार्ड नोंदणी,आरोग्य तपासणी व लसीकरण शिबीर आयोजित करण्यात आले. 

      या विशेष शिबिराकरिता प्रांताधिकारी प्रशांत ढगे, तहसिलदार मीनल दळवी,  तहसिलदार कार्यालयातील इतर अधिकारी-कर्मचारी, तालुका आरोग्य अधिकारी, पोयनाड प्राथमिक आरोग्य केंद्र, माणुसकी प्रतिष्ठानमधील डॉक्टर व आरोग्य कर्मचारी यांचे सहाय्य लाभले.

      या शिबिराद्वारे 21 निराधार वृद्धांची आधार कार्ड नोंदणी तर एकूण 36 वृद्धांना लसीकरणाचा पहिला डोस देऊन सर्वांची आरोग्य तपासणीही करण्यात आली, अशी माहिती अलिबाग तहसिलदार मीनल दळवी यांनी दिली.