शिवसेना विचुंबे महिला आघाड़ी तर्फ़े भव्य हळदी कूंकु समारंभ संपन्न
पनवेल /शंकर वायदंडे :- मंगलवार दि . १५ फेब्रुवारी रोजी शिवसेना विचुंबे,देवद व उसर्ली शाखा महिला आघाड़ी तर्फ़े शिवसेना भव्य हळदी-कुंकू समारंभ आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमास स्थानिक महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.परिसरातील महिलांनी या सवाष्णीचं लेनं असलेल्या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने कार्यक्रमात सहभाग नोंदविला.या समारंभामुळे पाली-देवद आणि उसर्ली शिवसेनेत चैतन्य निर्माण झाले आहे.
या कार्यक्रमाला कल्पनाताई पाटिल -उपजिल्हा संघटिका, रेवतीताई सकपाल-विधानसभा संघटिका, रियाताई तालुका संघटिका,अपूर्वा प्रभु-शहर संघटिका,मीना सद्रे( कामोठे शहर संपर्क प्रमुख),मेघा अवने ( कामोठे उपशहर संपर्क प्रमुख) शारदा पाटिल -उपविभाग संघटिका विचुंबे-देवद )ज्योती पाटिल ( शाखा संघटिका देवद ) यांनी कार्यक्रमाचे उत्तम नियोजन केले.अशाप्रकारे हळदी कुंकू समारंभ संपन्न झाला.