नगरसेविका नेत्रा किरण पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून नगरसेविका चषक २०२२ क्रिकेट स्पर्धांचे आयोजन

नगरसेविका नेत्रा किरण पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून नगरसेविका चषक २०२२  क्रिकेट स्पर्धांचे आयोजन


खारघर (प्रतिनिधी)- पनवेल महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ४ च्या नगरसेविका सौ.नेत्रा किरण पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून खारघर स्पोर्टस अकॅडमी यांच्या वतीने खारघर येथील सेंट्रल पार्क मेट्रो स्टेशन जवळच्या मैदानावर टेनिस क्रिकेट स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. सदर स्पर्धेमध्ये एकूण आठ संघांनी सहभाग नोंदवला होता प्रभागातील मुरबी स्पोर्ट्स या संघाने प्रथम पारितोषिक पटकावले द्वितीय पारितोषिक गोल्डन ईगल या टीमने पटकावले तसेच मुरबी स्पोर्ट्स टीमच्या विकी पाटील याने 29 चेंडू मध्ये आपले शतक पूर्ण केले विकीने पहिले शतक येथे पूर्ण करत आपल्या क्रिकेट करियर मध्ये सुरुवात केली.

         सदर क्रिकेट सामन्यांना पनवेल महानगर पालिकेच्या महापौर डॉक्टर कविता चोतमोल मॅडम, नगरसेवक प्रवीण पाटील, खारघर तळोजा भाजप मंडल अध्यक्ष ब्रिजेश भाई पटेल उपाध्यक्ष दिलीप जाधव, भरत कोंडाळकर सौ अर्चना बागल सौ मंजू चोप्रा सौ दीपा पिल्लाई यासह इतर पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते.

         पारितोषिक वितरण प्रसंगी नगरसेविका नेत्रा किरण पाटील यांनी उपस्थित सर्व खेळाडूंचे अभिनंदन केले व मैदानी खेळ खेळल्याने आपले स्वास्थ्य चांगले राहते त्याच बरोबर मागील दोन वर्षापासून कोरोना काळात आपण सर्वच घरात होतो त्यामुळे बरेच तरुणांचे मानसिक आरोग्य देखील बिघडले होते आता मैदानी खेळ खेळून पुन्हा आपण तंदुरुस्त होऊ या असा संदेश दिला. खारघर स्पोर्टस अकॅडमीचे अध्यक्ष किरण पाटील यांनी उपस्थितांचे आभार मानले व दर वर्षी अशाच टेनिस क्रिकेट स्पर्धांचे आयोजन अधिक चांगल्या प्रकारे करु या असे आश्वासित केले. सदर स्पर्धा यशस्वी करण्यासाठी पनवेल टेनिस क्रिकेट असोसिएशनचे संदीप पाटील खारघर स्पोर्टस अकॅडमीचे गिरीश केनी, सुमित गायकवाड, गोपाल राजपूत आदित्य हाटगे यांनी मेहनत घेतली.


Popular posts
नेरुळ–उरण लोकल १२ डब्यांची करावी तसेच फेऱ्या वाढवाव्यात —प्रितम म्हात्रे यांचा पाठपुरावा
Image
नविन पनवेल मधील जुन्या रस्त्यांची रुंदी वाढवून इमारत आराखडयास पुर्नबांधणी परवानगी देण्याची मा.नगरसेवक ऍड मनोज भुजबळ यांची मागणी
Image
खारघरच्या मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये स्ट्रोक युनिटला शुभारंभ - मुंबई, पनवेल आणि आसपासच्या शहरातील रुग्णांना घेता येणार सुविधेचा लाभ
Image
पनवेल युवा दिपावली अंक उत्कृष्ट आणि वाचनीय -- लोकनेते रामशेठ ठाकूर
Image
काँग्रेसच्या महिला रायगड जिल्हाध्यक्ष पदी रेखा घरत यांची नियुक्ती-सर्वच स्तरातून अभिनंदन व शुभेच्छांचा वर्षाव.
Image