खारघर येथील बंद अवस्थेतील विरंगुळा केंद्र पनवेल मनपाचे सभागृह नेते परेश ठाकूर यांनी नागरिकांनसाठी खुले केले
खारघर (प्रतिनिधी)- खारघर सेक्टर 8 प्लॉट नंबर 1 या ठिकाणी सिडकोच्या माध्यमातून तयार करण्यात आलेले *ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र* डिसेंबर 2018 रोजी तयार करण्यात आले होते, परंतु आजपर्यंत या विरंगुळा केंद्राचा वापर येथील ज्येष्ठ नागरिकांना सिडकोच्या माध्यमातून करण्यास दिला जात नव्हता.
आज *पनवेल महानगर पालिकेचे सभागृहनेते श्री. परेश ठाकूर साहेब* यांनी या विरंगुळा केंद्राची पाहणी केली असता सदर विरंगुळा केंद्राला लॉक असल्याचे दिसले. सदर विरंगुळा केंद्राबाबत पनवेल महानगरपालिका व *स्थानिक नगरसेविका सौ. आरती केतन नवघरे* तसेच सर्व पदाधिकाऱ्यांनी वेळोवेळी मागणी करूनसुद्धा सिडको याबाबत ठाम भूमिका घेत नाही. प्रत्येक वेळी तांत्रिक अडचण सांगून सदर बाबतीत वेळ काढून नेत असल्याचे निदर्शनास आले.
शेवटी आज श्री. परेश ठाकूर साहेब यांनी सदर विरंगुळा केंद्राचे लॉक तोडून सदर विरंगुळा केंद्र जनतेस उपलब्ध करून दिला व यावेळी त्यांनी स्पष्टपणे सांगितले की आम्ही हे विरंगुळा केंद्र जनतेच्या पैशातून तयार झाल्यामुळे वापराकरता जनतेला स्वाधीन करत आहोत, सिडकोला जर आमची भूमिका चुकीची वाटत असेल तर आमच्यावर तक्रार दाखल करा अन्यथा आमची भूमिका योग्य वाटते तर आम्हाला सहकार्य करा.
तसेच येथील ज्येष्ठ नागरिकांच्या मागणीनुसार विरंगुळा केंद्र व त्याच्यामागे असलेली झाडे यांकरता पाण्याची सोय उपलब्ध करून देण्याबाबत सभागृहनेते श्री. परेश ठाकूर साहेब यांच्या निदर्शनास आणल्यावर त्यांनी *स्वतः सदर विरंगुळा केंद्राकरिता बोअरवेल करून देणार असे जाहीर केले* सदर प्रसंगी उपस्थित असलेले सर्व ज्येष्ठ नागरिक यांनी *श्री. परेश ठाकूर साहेब* यांचे अभिनंदन केले पुढील दहा दिवसांत सदर ठिकाणी बोअरवेल बसवुन तिचे काम पूर्ण केले जाईल.
सदर प्रसंगी स्थानिक नगरसेविका सौ. आरती केतन नवघरे, स्थायी समिती सभापती श्री. नरेश ठाकूर ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष श्री. अविनाश पाटील, खारघर तळोजा मंडळ अध्यक्ष श्री. ब्रिजेश पटेल, श्री. दशरथ लेंडवे, श्री. काळे, श्री. रमेश तपासे, श्री. हलगली, खारघर शहर सरचिटणीस श्री. किर्ती नवघरे, श्री. समीर कदम, श्री. अमर उपाध्याय, प्रभाग 6 अध्यक्ष श्री. विलास निकम, सनी नवघरे अक्षय लोखंडे व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.