शिवसेना पनवेल महानगर तर्फे अनोखा कार्यक्रम...मराठी पाट्या लावणाऱ्या दुकानदार,व्यापऱ्यांचा सत्कार करून साजरा केला मराठी राजभाषा दिन

शिवसेना पनवेल महानगर तर्फे अनोखा कार्यक्रम...मराठी पाट्या लावणाऱ्या दुकानदार,व्यापऱ्यांचा सत्कार करून साजरा केला मराठी राजभाषा दिन


पनवेल (प्रतिनिधी)-थोर साहित्यिक कुसुमाग्रज यांचा जन्मदिन मराठी राजभाषा दिन म्हणून २७ फेब्रुवारी रोजी संपूर्ण महाराष्ट्रात साजरा करण्यात येतो. शिवसेना पनवेल महानगर तर्फे हा दिवस अत्यंत आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला. राज्यभरातील सर्व दुकानांच्या पाट्या या सरसकट मराठी अक्षरात असतील असा निर्णय राज्य शासनाने जाहीर केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी शिवसेना पक्ष पुढे सरसावला व त्यांनी अनेक दुकानदारांना पत्र देऊन आपल्या पाट्या मराठीत लावण्याची विनंती केली तर अनेकदा आक्रमक होत या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी भाग पाडले. परंतु शिवसेना पनवेल महानगर संघटक माजी नगरसेवक ऍड. प्रथमेश चंद्रशेखर सोमण यांच्या संकल्पनेनुसार शिवसेना पनवेल महानगर तर्फे महानगर प्रमुख रामदास शेवाळे व महानगर संघटक प्रथमेश सोमण यांनी पनवेलमधील मराठी पाट्या लावणाऱ्या दुकानदारांचा आज सत्कार केला. अनेकांनी पूर्वीपासूनच मराठी पाट्या लावल्या होत्या तर काहींनी शासनाच्या या निर्णयानंतर आपल्या दुकानांवरील पाट्या ठळक स्पष्ट मराठी भाषेत लिहिल्या. अशा पाट्या लावणाऱ्या अनेक दुकानांपैकी  काही प्रातिनिधिक दुकानात जाऊन मानपत्र व पुस्तक भेट देऊन सत्कार करण्यात आला व दुकानांच्या बाहेर अभिनंदन करणारे स्टिकर्स लावण्यात आले. *ज्याप्रमाणे मराठी पाट्यांच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी आक्रमक होणारा शिवसैनिक असतो तसाच माय मराठीचा मान राखल्यावर कौतुक करणाराही ही  शिवसैनिकच असतो असे मत प्रथमेश सोमण यांनी व्यक्त केले* तर *संपूर्ण महानगर क्षेत्रात  शिवसेनेतर्फे मराठी पाट्या लावणाऱ्यांचे कौतुक करण्यात येईल असे रामदास शेवाळे यांनी जाहीर केले.* शिवसेनेच्या या उपक्रमामुळे *पनवेलमधील दुकानदार व व्यापाऱ्यांमध्ये एक चांगला सकारात्मक संदेश गेल्याचे मत व्यापाऱ्यांनी व्यक्त केले.* यावेळी पनवेलचे उप महानगर संघटक अच्युत मनोरे, शहर प्रमुख प्रवीण जाधव, युवासेनेचे विधानसभा अधिकारी पराग मोहिते, महिला आघाडीच्या शहर संघटिका अर्चना कुलकर्णी, उपशहर प्रमुख राहुल गोगटे, अब्रार मास्टर, सनी टेमघरे उपविभाग प्रमुख बाळा शेटे, शाखाप्रमुख अभिजीत साखरे, प्रसाद सोनवणे माजी नगरसेवक विश्वास म्हात्रे व इतर पदाधिकारी शिवसैनिक उपस्थित होते.

Popular posts
आमदार विक्रांत दादा पाटील यांच्या पुढाकाराने सिडकोच्या "माझ्या पसंतीचे घर" योजनेतील हजारो नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न!
Image
कळंबोली वहातुक शाखेकडून वाहन चालकांचे प्रबोधन
Image
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या उपनेतेपदी बबनदादा पाटील यांची नियुक्ती होताच शिवसैनिकांमध्ये उत्साह
Image
खारघर सेक्टर २० शहा किंग्डम येथील बांधकाम व्यावसायिकाकडून होत असलेल्या वायु व ध्वनी प्रदूषणापासून नागरिकांची सुटका करावी-सौ.नेत्रा पाटील
Image
गेल्या काही वर्षांपासून होणाऱ्या खांद्याच्या वेदनेपासून तिला मिळाला आराम;खारघरच्या मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये ६५ वर्षीय महिलेवर यशस्वी उपचार - दुर्बीणीद्वारे केली खांद्यांवर शस्त्रक्रिया
Image