शिष्यवृत्ती परीक्षेत कु.अविष्का घरत चमकली

शिष्यवृत्ती परीक्षेत कु.अविष्का घरत चमकली



नवीन पनवेल (प्रतिनिधी)महाराष्ट्र राज्य परीक्षा महामंडळा मार्फत ऑगस्ट २०२१ रोजी घेण्यात आलेल्या पूर्व उच्च  प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेचा (इयत्ता पाचवी) निकाल नुकताच जाहीर झाला असून या परीक्षेत कु.अविष्का महेश घरत इयत्ता पाचवी मराठी माध्यम हिने नवी मुंबई विभागात प्रथम तर ठाणे जिल्ह्यात पाचवा क्रमांक पटकाविला आहे. तिला ८७.३३  टक्के गुण मिळाले आहेत.

              कु.अविष्का महेश घरत ही ज्ञान विकास प्राथमिक विद्यालय कोपरखैरणे या विद्यालयाची विद्यार्थिनी असून या विद्यालयाचे  ओमकार तानाजी काळे ,सत्यवान संदीप धापते, साईराज संतोष बैलकर, शिवराज अनिल चटाले हे चार विद्यार्थी सुद्धा शिष्यवृत्तीस पात्र ठरले आहेत.

   कु.अविष्का महेश घरत हिस मिळालेल्या या घवघवीत यशाबद्दल तिचे संस्थेचे अध्यक्ष ॲड.पी.सी.पाटील, मार्गदर्शक दळवीसर,पडळकरसर, बोडकेसर तसेच सौ. ईशा सावंत, अलका चव्हाण, मुख्याध्यापिका सुमित्रा पाटील यांनी विशेष कौतुक केले आहे.



Popular posts
नेरुळ–उरण लोकल १२ डब्यांची करावी तसेच फेऱ्या वाढवाव्यात —प्रितम म्हात्रे यांचा पाठपुरावा
Image
नविन पनवेल मधील जुन्या रस्त्यांची रुंदी वाढवून इमारत आराखडयास पुर्नबांधणी परवानगी देण्याची मा.नगरसेवक ऍड मनोज भुजबळ यांची मागणी
Image
खारघरच्या मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये स्ट्रोक युनिटला शुभारंभ - मुंबई, पनवेल आणि आसपासच्या शहरातील रुग्णांना घेता येणार सुविधेचा लाभ
Image
दंगा काबू योजनेची उलवा पोलीस ठाणे कडून रंगीत तालीम
Image
काँग्रेसच्या महिला रायगड जिल्हाध्यक्ष पदी रेखा घरत यांची नियुक्ती-सर्वच स्तरातून अभिनंदन व शुभेच्छांचा वर्षाव.
Image