कवी कुसुमाग्रज जयंती व मराठी भाषा दिना निमित्त राज्यस्तरीय ऑनलाईन निबंध स्पर्धेचे आयोजन


कवी कुसुमाग्रज जयंती व मराठी भाषा दिना निमित्त राज्यस्तरीय ऑनलाईन निबंध स्पर्धेचे आयोजन


*निबंध पाठविण्याची अंतिम तारीख 15 फेब्रुवारी 2022*

अलिबाग,दि.30 (जिमाका):-  दरवर्षी कवी कुसुमाग्रज यांची जयंती व मराठी भाषा दिन दि. 27 फेब्रुवारी रोजी साजरा करण्यात येतो. या दिनाचे औचित्य साधून यावर्षी उरण तालुक्यातील श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्था महाराष्ट्र व रायगड जिल्हा माहिती कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय ऑनलाईन निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

        या ऑनलाईन स्पर्धेसाठी निबंध मराठी भाषेतच लिहिणे आवश्यक आहे. निबंध कागदावर सुवाच्च, स्वच्छ सुंदर अक्षरात लिहून vitthalmamtabade2015@gmail.com या ई-मेलवर पाठवावा. 

        निबंधाच्या शेवटी निबंध लिहिणाऱ्याचे संपूर्ण नाव, पत्ता, इयत्ता, वय, संपर्क क्रमांक लिहावा. निबंध पाठविण्याची अंतिम तारीख 15 फेब्रुवारी 2022 आहे. 

    *पहिला गट-* इयत्ता 5 वी ते 7 वी विषय -माझी आवडती भाषा मराठी , शब्द मर्यादा 500

     *दुसरा गट -* इयत्ता 8 वी ते 10 वी, विषय -मातृभाषेचे महत्व , शब्द मर्यादा 800

     *तिसरा गट -* 11 वी ते 12 वी,विषय -27 फेब्रुवारी मराठी राजभाषा दिन, शब्द मर्यादा 1000

  *चौथा गट -* महाविद्यालयीन प्रथम वर्ष ते तृतीय वर्ष (पदवीचे शिक्षण घेणारे विद्यार्थी ),विषय - मराठी भाषेच्या संरक्षणासाठी, संवर्धनासाठी विविध उपाययोजना, शब्द मर्यादा 1200

    *पाचवा गट -*  खुला गट (कोणतेही स्त्री पुरुष ),विषय - मराठी भाषेचे वर्तमान आणि भविष्य, शब्द मर्यादा -1500

     सर्वोत्कृष्ट निबंधासाठी 1 ते 3 क्रमांक प्राप्त झालेल्या विजेत्यांना आकर्षक भेटवस्तू व प्रमाणपत्र देण्यात येईल.

     या स्पर्धेसाठी नाव नोंदणी व अधिक माहितीकरिता श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्थेचे अध्यक्ष श्री. सुदेश पाटील (संपर्क क्र. 7208631009 ), कार्याध्यक्ष श्री.विठ्ठल ममताबादे (संपर्क क्र. - 9702751098) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा माहिती अधिकारी मनोज शिवाजी सानप आणि श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सुदेश पाटील, कार्याध्यक्ष विठ्ठल ममताबादे यांनी केले आहे.

Popular posts
आमदार विक्रांत दादा पाटील यांच्या पुढाकाराने सिडकोच्या "माझ्या पसंतीचे घर" योजनेतील हजारो नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न!
Image
कळंबोली वहातुक शाखेकडून वाहन चालकांचे प्रबोधन
Image
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या उपनेतेपदी बबनदादा पाटील यांची नियुक्ती होताच शिवसैनिकांमध्ये उत्साह
Image
खारघर सेक्टर २० शहा किंग्डम येथील बांधकाम व्यावसायिकाकडून होत असलेल्या वायु व ध्वनी प्रदूषणापासून नागरिकांची सुटका करावी-सौ.नेत्रा पाटील
Image
गेल्या काही वर्षांपासून होणाऱ्या खांद्याच्या वेदनेपासून तिला मिळाला आराम;खारघरच्या मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये ६५ वर्षीय महिलेवर यशस्वी उपचार - दुर्बीणीद्वारे केली खांद्यांवर शस्त्रक्रिया
Image