सरचिटणीस दीपक शिंदे यांच्या पाठपुराव्याला यश
खारघर (प्रतिनिधी)- गेले कित्येक महिने खारघर मधील बँक ऑफ इंडिया सेक्टर ७ ते नवरंग सेक्टर १२ मधील मुख्य व रहदारीच्या रस्त्यावरील दुभाजक अतिशय वाईट अवस्थेत असताना त्याठिकाणी नेहमीच छोटे मोठे अपघात व वाहनांच्या रांगा लागून रहदारी व्हायची.भारतीय जनता पार्टी चे खारघर मंडल सरचिटणीस यांनी मंडल अध्यक्ष ब्रिजेश पटेल, नगरसेवक शत्रुघ्न काकडे व नगरसेवक रामजी भाई बेरा तसेच सिडको कार्यकारी अभियंता यांच्याशी सतत संपर्क साधून हे काम करून घेतले.या सुस्थितीत झालेल्या दुभाजकामुळे व त्यापासून त्रासापासून मुक्त झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त करून कौतुक केले.