कृष्णा खारपाटील यांचे दुःखद निधन

 कृष्णा खारपाटील यांचे दुःखद निधन


पनवेल(प्रतिनिधी)- चिरनेर ग्रामपंचायत चे माजी सदस्य, लोकनेते दि बा पाटील यांच्यासोबत अनेक शेतकरी आंदोलनात सहभाग घेतलेले  दिबांचे  विश्वासू सहकारी, शेतीनिष्ठ शेतकरी ,मल्लखांबपट्टू  कुस्तीगीर ,कृष्णा गणू खारपाटील यांचे काल शनिवार दिनांक  22 जानेवारी रोजी चिरनेर येथे  82 व्या वर्षी वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले.  त्यांच्या तरुणपणी चिरनेर मधील दहीहंडी फोडणारा एकमेव गोविंदा अशी त्यांची ओळख होती. शेती,मासळी , बैल, बैलगाडी यांच्यात ते आयुष्यभर रमले. त्यांच्या पश्चात  पत्नी राधा,  दिपक, ज्योती , कांचन ही त्यांची मुले, नातवंडे असा मोठा परिवार आहे. पत्रकार मिलिंद खारपाटील यांचे ते काका. त्यांचे दशक्रिया विधी चिरनेर खाडी येथे 31 जानेवारी रोजी होणार असून अंतिम कार्य 2 फेब्रुवारी रोजी चिरनेर येथील राहत्या घरी होणार आहे.

Popular posts
क्रिकेट सामन्यांचे शेकाप नेते प्रीतम म्हात्रे यांच्या हस्ते उद्घाटन
Image
मेडिकवर हॉस्पिटलमध्ये मिट्राक्लिप प्रक्रियेनंतर ७८ वर्षीय रुग्णाच्या हृदयविकारावर यशस्वी उपचार
Image
पनवेल युवा चे संपादक निलेश सोनावणे याना मुंबई विद्यापीठाचे मा कुलगुरू तथा मा खासदार डॉ भालचंद्र मुणगेकर यांच्या हस्ते साने गुरुजी राष्ट्र प्रेरणा पुरस्कार प्रदान
Image
प्रवेशद्वाराचे शेकाप नेते प्रीतम म्हात्रे यांच्या हस्ते भूमिपूजन
Image
जितेंद्र म्हात्रेंना राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर!पनवेल तालुका पोलीस ठाण्यात कर्तव्यावर
Image