चालत्या ट्रेनमध्ये चढताना महिलेचा गेला तोल-आरपीएफ कॉन्स्टेबल काडूराम मीना यांनी वाचवलं महिलेचं जीव

चालत्या ट्रेनमध्ये चढताना महिलेचा गेला तोल-आरपीएफ कॉन्स्टेबल काडूराम मीना यांनी वाचवलं महिलेचं जीव


पनवेल(प्रतिनिधी)-  पनवेल रेल्वे स्थानकावर चालत्या ट्रेनमध्ये चढताना एका महिलेचा तोल गेल्याची धक्कादायक घटना घडली. यावेळी त्याठिकाणी उपस्थितीत असलेल्या आरपीएफ कॉन्स्टेबलने  प्रसंगावधान राखत महिलेला खेचून तिचा जीव वाचवला. पनवेल रेल्वे स्टेशनवर घडलेली घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे. सदर महिला पनवेल रेल्वे स्थानकावरून लखनऊ येथे जाणाऱ्या ट्रेनमध्ये कामोठे येथे राहणाऱ्या ज्ञानदेवी राणा या आपला  मुलगा अजय याच्यासह चढत होत्या. त्यांची सीट आरक्षित होती. वेळेवर न पोहोचल्याने ट्रेन सुटल्यानंतर घाई गर्दीने चालत्या ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न करत होती. ट्रेन ठराविक वेग घेण्याच्या पूर्वी सदर महिलेला ट्रेनमध्ये चढता आले नाही. त्यातच तिचा तोल गेल्याने ती स्थानकावर घसरली रेल्वे पोलिस काडूराम मीना यांनी क्षणात धाव घेतली नसती तर कदाचित ती प्लॅटफॉममधून रेल्वे रुळावर खेचली गेली असती. महिलेचे जीव वाचविणाऱ्या आरपीएफ कॉन्स्टेबल काडूराम मीना यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.