पनवेल वकिल संघटना आणि अधिवक्ता परिषद,यांच्या संयुक्त विद्यमाने बार कौन्सिल महाराष्ट्र आणि गोवाचे चेअरमन अ‍ॅड. गजानन चव्हाण आणि व्हाईस चेअरमन अ‍ॅड. संग्राम देसाई यांचा सत्कार

पनवेल वकिल संघटना आणि अधिवक्ता परिषद,यांच्या संयुक्त विद्यमाने बार कौन्सिल महाराष्ट्र आणि गोवाचे चेअरमन अ‍ॅड. गजानन चव्हाण आणि व्हाईस चेअरमन अ‍ॅड. संग्राम देसाई यांचा सत्कार


पनवेल, दि.22 (संजय कदम) ः पनवेल वकिल संघटना आणि अधिवक्ता परिषद, पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने बार कौन्सिल महाराष्ट्र आणि गोवाचे चेअरमन अ‍ॅड. गजानन चव्हाण आणि व्हाईस चेअरमन अ‍ॅड. संग्राम देसाई यांचा सत्कार पनवेल येथे करण्यात आला.

यावेळी उभयतांनी बार कॉन्सिलच्या माध्यमातून वकिलांकरिता सुरू असलेल्या विविध कल्याणकारी योजनांची सविस्तर माहिती दिली. कार्यक्रमाची प्रस्तावना पनवेल वकिल संघटना आणि अधिवक्ता परिषद, पनवेलचे अध्यक्ष अ‍ॅड. मनोज भुजबळ यांनी केली. पाहुण्यांची ओळख जेष्ठ  अ‍ॅड. दिपक गायकवाड यांनी करून दिली आणि सूत्रसंचालन अ‍ॅड. सुनील तेलगे व आभार प्रदर्शन अ‍ॅड. संतोष पवार यांनी केले. याप्रसंगी पनवेल वकिल संघटना आणि अधिवक्ता परिषद, पनवेलचे पदाधिकारी यांच्यासह पनवेल-उरण येथील अनेक ज्येष्ठ व नवोदित विधिज्ञ उपस्थित होते.


Popular posts
क्रिकेट सामन्यांचे शेकाप नेते प्रीतम म्हात्रे यांच्या हस्ते उद्घाटन
Image
मेडिकवर हॉस्पिटलमध्ये मिट्राक्लिप प्रक्रियेनंतर ७८ वर्षीय रुग्णाच्या हृदयविकारावर यशस्वी उपचार
Image
पनवेल युवा चे संपादक निलेश सोनावणे याना मुंबई विद्यापीठाचे मा कुलगुरू तथा मा खासदार डॉ भालचंद्र मुणगेकर यांच्या हस्ते साने गुरुजी राष्ट्र प्रेरणा पुरस्कार प्रदान
Image
प्रवेशद्वाराचे शेकाप नेते प्रीतम म्हात्रे यांच्या हस्ते भूमिपूजन
Image
जितेंद्र म्हात्रेंना राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर!पनवेल तालुका पोलीस ठाण्यात कर्तव्यावर
Image