रयत शिक्षण संस्थेचे मानद सचिव पै. इस्माईलसाहेब मुल्ला यांना अभिवादन

रयत शिक्षण संस्थेचे मानद सचिव पै. इस्माईलसाहेब मुल्ला यांना अभिवादन

 सातारा (प्रतिनिधी)-  रयत शिक्षण संस्थेचे मानद सचिव पै. इस्माईलसाहेब मुल्ला यांचा पुण्यतिथी कार्यक्रम सातारा येथील संस्था कार्यालयात व त्यांच्या समाधी स्थळावर आयोजित करण्यात आला होता. यावेळी रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन डॉ. अनिल पाटील, मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, सचिव प्राचार्य डॉ. विठ्ठल शिवणकर, ऑडिटर डॉ. शिवलिंग मेनकुदळे, कायदा सल्लागार ऍड. डी. आय. एस. मुल्ला, यांच्यासह प्राचार्य शहाजी डोंगरे, समन्वयक डी. एल. सुर्यवंशी, वाय. सी. कॉलेजचे प्राचार्य बी. टी. जाधव, प्राचार्य डॉ. अत्तार आणि रयत सेवकांनी कार्यालयात तसेच समाधी स्थळावर पै. इस्माईलसाहेब मुल्ला यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन केले.