दापोली मंडणगड नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूकीसाठी सुटी जाहीर

दापोली मंडणगड नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूकीसाठी सुटी जाहीर


रत्नागिरी दि.20:-सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय, मुंबईच्या 17 डिसेंबर 2021 च्या अधिसूचनेनुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक व पोटनिवडणूकांच्या अनुषंगाने मंगळवार 21 डिसेंबर 2021 रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड व दापोली नगरपंचायतीच्या मतदार संघात सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे.  ही सार्वजनिक सुट्टी दापोली व मंडणगड नगरपंचायत मतदारसंघाच्या क्षेत्रातील जे मतदार कामासाठी संबंधित मतदारसंघाच्या बाहेर असतील त्यांनादेखील लागू राहील.  तसेच केंद्र शासनाची शासकीय कार्यालये, निमशासकीय कार्यालये, सार्वजनिक उपक्रम, बँका इत्यादींनाही सदर सार्वजनिक सार्वजनिक सुट्टी लागू राहील, असे जिल्हाधिकारी डॉ. बी.एन.पाटील यांनी कळविले आहे.