मेंदूच्या विकाराने पिडीत ५०% रुग्ण करताय उपचारास विलंब;स्ट्रोक, एन्युरिझम आणि ब्रेन ट्यूमरच्या वेळीच निदानाने टाळता येईल जीवघेणी गुंतागुंत : तज्ञांनी दिला इशारा
नवी मुंबई: स्ट्रोक, एन्युरिझम आणि ब्रेन ट्यूमरसारखे मेंदूचे विकारांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे आणि भारतात अपंगत्व आणि मृत्यूचे हे एक प्रमुख कारण ठरत आहे. जगण्याचे प्रमाण सुधारण्यासाठी आणि दीर्घकालीन अंपगत्व टाळण्यासाठी वेळीच निदान महत्वाचे आहे. दुर्दैवाने, जागरूकतेच्या अभावामुळे रुग्ण उपचारास विलंब करतात , ज्यामुळे ते पूर्णपणे बरे होण्याची शक्यता कमी होते. उपलब्ध प्रगत वैद्यकीय चाचण्या आणि उपचारांमुळे, यशस्वी रुग्ण व्यवस्थापनासाठी लक्षणे वेळीच ओळखणे आणि त्वरित वैद्यकीय मदत घेणे गरजेचे आहे आहे.
बऱ्याच व्यक्ती त्यांच्या मेंदूच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात जे भविष्यात गंभीर रुप धारण करु शकते. मेंदूशी संबंधित समस्यांबद्दल आजही जागरूकतेचा अभाव आहे. जेव्हा मेंदूला रक्तपुरवठा खंडित होतो किंवा कमी होतो, तेव्हा मेंदूच्या पेशींना ऑक्सिजन मिळणे बंद होते आणि स्ट्रोक येतो. अचानक अशक्तपणा अस्पष्ट वाचा, चेहरा एका बाजूला झुकणे आणि संतुलन बिघडणे ही त्याची लक्षणे आहेत. मेंदूतील रक्तवाहिनीतील फुल्यामुळे देखील मेंदूमध्ये जीवघेणा रक्तस्त्राव होऊ शकतो. तीव्र डोकेदुखी, अंधुक दृष्टी, मळमळ आणि संवेदना नष्ट होणे ही त्याची प्रमुख लक्षणं आहेत. मेंदूत किंवा आजूबाजूला असामान्य पेशी अनियंत्रितपणे वाढतात तेव्हा ब्रेन ट्यूमर विकसित होतो. लक्षणे वेगवेगळी असतात परंतु बहुतेकदा डोकेदुखी, उलट्या, बोलण्यात अडखळणे आणि स्मरणशक्तीच्या समस्या यांचा समावेश होतो. वेळीच उपचार न केल्यास किंवा उशिरा निदानाने अशा स्थितींमुळे मेंदूचे नुकसान होऊ शकते,असे नवी मुंबईतील न्यूईरा हॉस्पिटलचे न्यूरोलॉजिस्ट डॉ. राम भाग्यवंत यांनी स्पष्ट केले.
नवी मुंबईतील न्यूईरा हॉस्पिटलचे न्यूरोसर्जन (मेंदू आणि मणका) डॉ. सुनील कुट्टी सांगतात की, ५०% लोक मेंदूच्या विकारांच्या सुरुवातीच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करतात आणि उपचारांना विलंब करतात. डोकेदुखी, शरीराच्या एका बाजूला येणारा अशक्तपणा किंवा अस्पष्ट बोलणे यासारख्या लक्षणांना थकवा किंवा ताण समजून त्याकडे दुर्लक्ष करू नका. हे स्ट्रोक किंवा एन्युरिझमचे लक्षण असू शकते. सीटी स्कॅन, एमआरआय आणि अँजिओग्राफी सारख्या तपासण्या करुन स्ट्रोक, एन्युरिझम आणि ट्यूमरसारखी स्थिती सुरुवातीच्या टप्प्यात ओळखणे शक्य आहे आणि त्यामुळे जीवघेणी गुंतागुंत टाळता येते. लक्षात ठेवा, मेंदूच्या आरोग्याच्या बाबतीत प्रत्येक मिनिट महत्त्वाचा ठरतो. वेळीच निदान केल्याने डॉक्टरांना ताबडतोब उपचार सुरू करता येतात, ज्यामुळे अर्धांगवायू, स्मरणशक्ती कमी होणे आणि पक्षाघातासारखे कायमचे अपंगत्व टाळता येते. आपल्या कुटुंबातील किॅवा मित्रपरिवारातील एखाद्या व्यक्तीत अचानक न्यूरोलॉजिकल बदल दिसल्यास त्यांनी त्वरित वैद्यकिय मदत घ्यावी.
डॉ. कुट्टी पुढे सांगतात की, तुमच्या मेंदूची काळजी घेण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे ब्रेन डॉक प्रोग्राम. यामध्ये एमआरआय ब्रेन आणि एमआरआय अँजिओद्वारे मेंदूची तपासणी केली जाते. यामुळे एन्युरिझम फुटण्यापूर्वीच त्याचा शोध घेता येतो, एव्हीएम आणि लहान ट्यूमर देखील सुरुवातीच्या टप्प्यात आढळून येतात. मेंदू हा खुप नाजूक अवयव आहे म्हणून त्यासंबंधी काही असामान्य बदल दिसल्यास वेळीच तपासणी करणे गरजेचे आहे. ब्रेन डॉक हे मेंदूचे आजार त्वरीत ओळखून त्यावर अचुक उपचारास मदत करते.