जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धेत पनवेल मधील रुद्राणी पाटीलला तीन सुवर्णपदक

जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धेत पनवेल मधील  रुद्राणी पाटीलला तीन सुवर्णपदक


पनवेल:पनवेल येथील रुद्राणी परेश पाटील या आठ वर्षाच्या चिमुकलीने दि.15 रोजी उरण येथे आयोजित जिल्हा स्तरित जलतरण आमदार चषकात तब्बल 3 सुवर्ण पदक पटकावले आहेत. रुद्राणीने 50 मीटर फ्रीस्टाइल, बॅक स्ट्रोक, व बटरफ्लाय या तीन प्रकारांमध्ये प्रथम क्रमांक व ब्रेस्टस्ट्रोक या प्रकारामध्ये तृतीय क्रमांक मिळवून सर्व स्पर्धकांवर आपले वर्चस्व सिद्ध केले.

    स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून उरण नगरपरिषद व महेश बालदी मित्र मंडळ, उरण यांच्या संयुक्त विद्यमानाने या जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.या स्पर्धेमध्ये रायगड जिल्ह्यातील विविध तालुक्यांमधून वयोगट 6 ते 60 वर्षां खालील अनेक जलतरणपट्टूनीं  सहभाग घेतला होता.या स्पर्धेत कुमारी रुद्राणी परेश पाटील हिने 8 वर्षांखालील गटांमध्ये अप्रतिम कामगिरी करून आपले कौशल्य सिद्ध केले.तिच्या या कामगिरीबद्दल तिला 3 सुवर्ण पदके व 1 कांस्य पदक तसेच चॅम्पियनशिप ट्रॉफी प्रदान करण्यात आली.रुद्राणीच्या या उत्तुंग यशामध्ये तिचे प्रशिक्षक समर्थ नाईक व सुजल मढवी यांचे उत्कृष्ट मार्गदर्शन लाभले आहे. तिच्या या उत्तुंग कामगिरीमुळे पनवेल मधील कल्पतरू सोसायटी तिचे मूळ गाव खोपटे मध्ये तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे.

Popular posts
अशोक गावडे फाऊंडेशन आणि श्री गणेश सांस्कृतिक क्रीडा मंडळ यांच्या नवीन वर्षाच्या कॅलेंडरचे अनावरण नुकतेच संपन्न झाले
Image
मसाजच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्याव्यवसायातुन 6 महिलांची गुन्हे शाखेतील पोलीसांनी केली सुटका
Image
रायगड जिल्ह्यातील कला शिक्षकांची जिल्हास्तरीय एकदिवसीय कार्यशाळा संपन्न
Image
विद्यार्थ्यांनी सर्वगुणसंपन्न विशेष क्रीडा नैपुण्य पारंगत असावे__नागेंद्र म्हात्रे
Image
कमल गौरी हिरु पाटील शिक्षण संस्थेचे दत्तात्रय (दत्ता म्हात्रे) वस्तीगृहाचे उदघाटन संस्थेचे चेरमन श्री.बबन दादा पाटील याच्या हस्ते संपन्न
Image