जिद्द आणि धाडस महत्वाचे - लोकनेते रामशेठ ठाकूर
जुन्या मुंबई पुणे हायवेवरील नढाळ येथे नव्याने अशोक लेलँड वाहनांचे आक्स फ्लीटवर्क हे वर्कशॉप सुरु करण्यात आले आहे. अनुप कांडपीळे यांनी सुरु केल्या या वर्कशॉपचे उद्घाटन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याहस्ते सोमवारी झाले. यावेळी त्यांनी कांडपीळे कुटूंबीयांचे अभिनंदन करुन त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते व माजी नगराध्यक्ष जे.एम. म्हात्रे यांनी ही शुभेच्छा दिल्या तसेच अनुप कांडपीळे यांनी आपल्या शिक्षणाचा शिक्षणाचा वापर पुरेपुर केला असून ते व्यवसायात नफी यशस्वी होतील असा विश्वास व्यक्त केला.
या कार्यक्रमावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते वाय.टी.देशमुख, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष जयंत पगडे, माजी नगरसेवक अजय कांडपीळे, तेजस कांडपीळे, मनोहर कांडपिळे, वैभव देशमुख, गौरव कांडपीळे, अविनाश शिंदे, अनुप कांडपीळे यांच्यासह अशोक लेलँडचे अधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते.