बांठिया विद्यालयात ’मेहफिल ए सुखन’ काव्य गजल संमेलन संपन्न

बांठिया विद्यालयात ’मेहफिल ए सुखन’ काव्य गजल संमेलन संपन्न




पनवेल, दि.6 (वार्ताहर) ः नवीन पनवेल येथील के. आ. बांठिया विद्यालय सभागृहात 3 मे रोजी मेहफिल ए सुखन काव्य गजल संमेलन पार पडले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी ’ती माणसं गेली कुठे ?’ या पुस्तकातील कविवर्य खावर यांच्या जीवनावरील लेखाचे अभिवाचन निलीमा काटके यांनी आपल्या ओघवत्या शैलीत सादर केले. या कार्यक्रमात ललित कला कोकण साहित्य रत्न पुरस्कार ललित कला फाउंडेशनचे अध्यक्ष दिलीप कारखानीस तसेच मंचावरील मराठी साहित्य क्षेत्रातील सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत संमेलनाध्यक्ष प्रा. तुकाराम दादा पाटील यांच्या हस्ते साहित्यिक इकबाल शर्फ मुकादम यांनी स्विकारला. कार्यक्रमात रत्नागिरी येथील ज्येष्ठ पत्रकार, प्रकाशक राजेंद्रप्रसाद मसुरकर, बेळगावहून डॉ. यासीन सही त्रासगर आणि इतर मान्यवरानी आपले मनोगत व्यक्त केले, सभागृहात दर्दी गजलप्रेमींची उपस्थिती विशेष जाणवली.


Popular posts
ठाणे आणि विटावा परिसरात "जनसभा" दिवाळी विशेषांकाचे प्रकाशन आणि वितरण
Image
आमदार विक्रांत पाटील यांना महाराष्ट्र प्रदेश निवडणूक संचालन समितीमध्ये 'राज्य निवडणूक समन्वयक' म्हणून विशेष जबाबदारी!
Image
८०० ग्रॅम वजनाच्या अकाली जन्मलेल्या बाळाची मृत्यूशी झुंज यशस्वी-नवी मुंबईतील मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये यशस्वी उपचार
Image
यूथ महाराष्ट्र संपादिका दिपालीताई पारसकर यांचा वाढदिवस साजरा – सामाजिक उपक्रमातून अनोखा आदर्श
Image
डॉ. नंदकुमार मारुती जाधव फाउंडेशन संचालित बौद्धिक अक्षम मुलांच्या विशेष शाळेत बालदिन उत्साहात साजरा
Image