महेंद्रशेठ घरत यांनी घेतले फुंडे, चिर्ले, भंगारपाडा येथे श्रीरामांचे दर्शन!

 महेंद्रशेठ घरत यांनी घेतले फुंडे, चिर्ले, भंगारपाडा येथे श्रीरामांचे दर्शन!



उरण दि ६(प्रतिनिधी )श्रीराम नवमीनिमित्त परिसरातील अनेक मंदिरांत जाऊन आज प्रभू श्रीरामांचे दर्शन आंतरराष्ट्रीय कामगार नेते आणि काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांनी घेतले. 
फुंडे येथील श्रीराम मंदिराचे बांधकाम होत असताना त्याकाळी महेंद्रशेठ घरत यांनी भरीव मदत करून मंदिराच्या बांधकामाचा प्रश्न सोडवला होता. त्यामुळे आज श्रीराम नवमीनिमित्त तेथील ग्रामस्थांनी स्वागत करून सन्मान केला. तसेच चिर्ले, भंगारपाडा, गव्हाण येथेही महेंद्रशेठ घरत यांनी श्रीरामांचे दर्शन घेतले. त्यावेळी त्या त्या गावच्या ग्रामस्थांनी आणि मंदिर समितीच्या वतीने महेंद्रशेठ घरत यांचा यथोचित सन्मान केला. यावेळी महेंद्रशेठ घरत यांनी विविध मंदिरात देणग्या दिल्या. यावेळी 'जय श्रीरामा'च्या नामघोषाने परिसर दुमदुमला होता. 
महेंद्रशेठ घरत हे वारी, धार्मिक सप्ताह, तसेच विविध मंदिरांसाठी नेहमीच सढळ हस्ते मदत करतात. त्यामुळेच दानशूर व्यक्तिमत्त्व म्हणून महेंद्रशेठ घरत यांचा नावलौकिक आहे.

Popular posts
भाजपा नगरसेविका नेत्रा किरण पाटील व युवाप्रेरणा सामाजिक संस्थेचे अध्यक्ष किरण पाटील यांच्या वतीने दोन दिवसीय आधार व मोफत आयुष्यमान भारतकार्ड शिबिर संपन्न
Image
आमदार विक्रांत पाटील यांच्या लढाऊ पाठपुराव्याला यश!-सिडकोच्या LIG व EWS घरांच्या किमती झाल्या 10% नी कमी;महायुती सरकारची सभागृहात घोषणा!
Image
डॉ. नंदकुमार मारुती जाधव यांना ‘महात्मा ज्योतिबा फुले नॅशनल सन्मानपदक’ जाहीर
Image
नाताळ व नवीन वर्षांच्या पार्श्‍वभुमीवर बनावट मद्य वाहतुकीवर पनवेल परिसरात कारवाई
Image
दिनेश झिंगे व अन्य ९ जणांनी लावला २५ लाखांना चुना-अरिहंत सुपरस्ट्रक्चर्स यांच्यावतीने गुन्हा दाखल करण्याची मागणी
Image