कामोठे येथील रामशेठ ठाकूर विद्यालयाला आयएसओ मानांकन

कामोठे येथील रामशेठ ठाकूर विद्यालयाला आयएसओ मानांकन


पनवेल(प्रतिनिधी ) रयत शिक्षण संस्थेच्या कामोठे येथील रामशेठ ठाकूर इंग्लिश मीडियम स्कूल आणि ज्युनिअर कॉलेजला आयएसओ मानांकन प्राप्त झाले आहे. विद्यालयाच्या प्राचार्य स्वप्नाली म्हात्रे यांनी हे प्रमाणपत्र स्वीकारले. दरम्यान, या यशाबद्दल संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी अभिनंदन केले.

           विविध उपक्रमांमध्ये नेहमीच अग्रेसर असणार्‍या विद्यालयाच्या शिरपेचात आयएसओ मानांकनाने मानाचा तुरा रोवला गेला आहे. विद्यार्थ्यांची प्रगती व सर्वांगीण विकास हाच ध्यास असणार्‍या या विद्यालयातील शैक्षणिक व इतर उपक्रम, भौतिक सुविधा, स्वच्छ व पोषक वातावरण या सार्‍याची दखल घेऊन हे मानांकन प्राप्त झाले आहे. वर्ष २०२५चे आयएसओ ९००१:२०१५ क्वालिटी मॅनेजमेंट सिस्टिमचे हे मानांकन प्रमाणपत्र किंगबर्ड कन्सल्टन्सीचे डायरेक्टर विजय नाळे तसेच ऑडिटर प्रमोद मांडवे यांच्या सहकार्याने मिळाले. गुणवत्तेच्या निकषातून प्राप्त झालेल्या आयएसओ मानांकनाने विद्यालयात आनंदाचे वातावरण पसरले आहे. या बहुमानाबद्दल लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्यासह विद्यालयाचे चेअरमन व पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर, रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य वाय.टी. देशमुख यांनी विद्यालयाच्या प्राचार्य स्वप्नाली म्हात्रे, सहकारी शिक्षक, कर्मचारीवृंद यांचे विशेष अभिनंदन केले. या वेळी संस्थेचे रायगड विभाग पीआरओ बाळासाहेब कारंडे, लोकनेते रामशेठ पब्लिक स्कूलचे मुख्याध्यापक अविनाश कुलकर्णी, पर्यवेक्षिका सारिका लांजूरकर, प्रियांका बांगर आदी उपस्थित होते.