प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) 2.0’ अंतर्गत नोंदणी करणेकरिता आवाहन
मा. प्रधानमंत्री महोदय यांनी दि.17 सप्टेंबर 2024 रोजी ‘प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) 2.0’ ची घोषणा केली असून त्यास अनुसरून महाराष्ट्र शासनाच्या गृहनिर्माण विभागाने ‘सर्वांसाठी घरे’ या संकल्पनेवर आधारित ‘प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) 2.0’ ची राज्यात अंमलबजावणी करण्याबाबत शासन निर्णय क्रमांकः प्रआयो-2024 / प्र.क्र.87 / गृनिधो - 2, दिनांक 15/10/2024 रोजी जारी केला आहे. सदर शासन निर्णयामध्ये खालील घटकांचा समावेश करण्यात आला आहे.
1) वैयक्तिक स्वरूपातील घरकुल बांधकाम (Beneficiary Led Construction) (BLC)
2) भागीदारी तत्वावरील परवडणारी घरे (Affordable Housing in Partnership) (AHP)
3) भाडे तत्वावर परवडणारी घरे (Affordable Rental Housing) (ARH)
4) व्याज अनुदान योजना (Interest Subsidy Scheme) (ISS)
या अनुषंगाने ‘प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) 2.0’ ची राज्यात अंमलबजावणी करणे तसेच ‘प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) 2.0’ अंतर्गत लाभार्थी सुनिश्चित करण्यासाठी केंद्र शासनाने एक युनिफाईड वेब पोर्टल (https://pmaymis.gov.in/
युनिफाईड वेब पोर्टलवर नोंदणी करणेकरीता लागणारी कागदपत्रे :
1) अर्जदाराचे आधारकार्ड, पॅन कार्ड (आधारकार्डनुसार नाव, जन्मतारीख, आधार क्र.)
2) कुटुंबातील इतर सदस्याचे आधार कार्ड (आधारकार्डनुसार नाव, जन्मतारीख, आधार क्र.)
3) उत्पन्नाचा दाखला (तहसीलदार यांचेकडील चालू आर्थिक वर्षातील)
4) बँक पासबुक (आधार लिंक केलेले असले पाहिजे)
5) जात प्रमाणपत्र (SC/ST/OBC घटकांसाठी लागू)
6) जमिनीची कागदपत्रे (घटक क्र.01 अंतर्गत अर्ज करणा-या लाभार्थ्यांकरिता)
तरी, इच्छुक लाभार्थी यांनी सदर योजनेंतर्गत नोंदणी करणेकरिता आवश्यक कागदपत्रांसह नवी मुंबई महानगरपालिका, समाज विकास विभाग, पहिला मजला, बेलापूर भवन, सेक्टर 11, सी.बी.डी. बेलापूर, नवी मुंबई येथील ‘प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) 2.0’ मदत कक्षाशी अथवा अधिक माहितासाठी 9967413935 या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात येत आहे.