कला संस्कृती भवन येथे नववा राष्ट्रीय परिसंवाद व पुरस्कार सोहळा थाटात संपन्न
पणजी/प्रतिनिधी
16 फेब्रुवारी 2025 रोजी पणजी गोवा, कला संस्कृती भवन येथे नवव्या राष्ट्रीय परिसंवादाचे व पुरस्कार सोहळा थाटात संपन्न- पणजी ,गोवा (दि.22, फेब्रुवारी 2025 )
बाबू जगजीवन राम कला संस्कृती साहित्य अकादमी, नवी दिल्ली शाखा महाराष्ट्र प्रदेश व इमेज इंटरनॅशनल रिसर्च असोसिएशन गोवा तसेच नॅशनल प्रधान मुख्य सरपंच संघ नवी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने नवव्या ग्लोबल युथ इमेज राष्ट्रीय परिसंवादाचे आयोजन नुकतेच 16 फेब्रुवारी 2025 रोजी गोवा येथील कला आणि संस्कृती भवन पणजीगोवा येथे करण्यात आले होते .या कार्यक्रमाचे आयोजन बाबू जगजीवन राम कला संस्कृती साहित्य अकादमी चे राज्यसचिव प्राध्यापक गोरख साठे व इमेज इंटरनॅशनल रिसर्च असोसिएशन आणि नॅशनल प्रधान मुख्य सरपंच संघ यांचे चेअरमन चीप एडिटर प्राध्यापक डॉक्टर बी एन खरात यांनी केले होते. यावेळी कला संस्कृती भवन पणजी गोवा येथील भव्य सभागृहामध्ये सुरुवातीस भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व लॉर्ड गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेचे पूजन व दिपप्रज्वलन मा.खा. प्रा.सुनिल गायकवाड , यांचे हस्ते करण्यात आले.यावेळी मुंबई महानगरपालिकेच्या माजी महापौर स्नेहल आंबेकर ,गोवा येथील प्रसिद्ध उद्योजक हेमंत कोळंबकर, प्रसिद्ध अभिनेते व दिग्दर्शक संजय मोहिते, डॉ. बी. एन. खरात सर सिंधुदुर्ग, बाबू जगजीवन राम कला संस्कृती तथा साहित्य अकादमी महाराष्ट्र प्रदेश सचिव प्रा.गोरख साठे, आर्मी ऑफिसर धनंजय डांगळे गोवा आदी मान्यवरांच्या उपस्थितीत नवव्या राष्ट्रीय परिसंवादाचे उद्घाटन करण्यात आले .यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटक मा.खा..डॉ. सुनील बळीराम गायकवाड म्हणाले की प्रा.गोरख साठे सर बारामती ,दरवर्षी देशाच्या विविध भागांमध्ये राष्ट्रीय परिसंवादाचे आयोजन व पुरस्कार वितरण सोहळाचे आयोजन करत असतात .समाजातील उपेक्षित वंचित घटकांना विशेष पुरस्कार देऊन ते त्यांच्या संस्था प्रतिनिधी व त्या व्यक्तींच्या सामाजिक कार्याचा गौरव करत असतात साठे सर यांचे सामाजिक कार्य अत्यंत प्रेरणादायी असल्याचे मत मा.खा.गायकवाड यांनी यावेळी व्यक्त केले .यावेळी गोवा येथील सुप्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते वसंतराव महाडिक यांच्या हस्ते मा.खा. डॉ .सुनील गायकवाड यांना लॉर्ड गौतम बुद्ध आंतरराष्ट्रीय जीवनगौरव पुरस्कार २०२५ देऊन सन्मानित महाराष्ट्र प्रदेश शाखेचे वतीने आंतरराष्ट्रीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.यावेळी महाराष्ट्रातील जवळजवळ वीस सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांना त्यांच्या अद्वितीय सामाजिक सेवा कार्या चा गौरव यावेळी करण्यात आला. त्यामध्ये बाबू जगजीवन राम कला संस्कृती साहित्य अकादमी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष व महाराष्ट्र युवक काँग्रेसचे सरचिटणीस प्रथमेश विकास आबनावे यांना राजीव गांधी नॅशनल एज्युकेशनल एक्सलन्स अवॉर्ड 2025 देऊन सन्मानित करण्यात आले त्यांच्या अनुपस्थितीत भानुदास दिनकर सोनवणे यांनी हा त्यांचा पुरस्कार स्वीकारला .यावेळी नालासोपारा येथील बाळकृष्ण राजाराम कांबळे यांना संत शिरोमणी रोहिदास महाराज राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. तसेच बारामती येथील प्रा.डॉ सुनील सुखदेव लोखंडे यांना भारतरत्न डॉ.ए.पी.जे .अब्दुल कलाम राष्ट्रीय पुरस्कार 2025 देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी भानुदास दिनकर सोनवणे यांना संत शिरोमणी रविदासजी राष्ट्रीय पुरस्कार 2025 ,उत्तम रामचंद्र सोनवणे संत शिरोमणी रविदास राष्ट्रीय पुरस्कार 2025, संताजी मारुती सोनवणे यांना संत शिरोमणी रविदास राष्ट्रीय पुरस्कार 2025 तसेच पाटस येथील संभाजी बापू खाडे यांना महात्मा ज्योतिबा फुले राष्ट्रीय पुरस्कार 2025, अकलूज येथील तुकाराम पद्माकर साळुंखे पाटील यांना महात्मा ज्योतिबा फुले 2025 निमगाव इंदापूर येथील संतोष भीमराव राजगुरू यांना भारतरत्न डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम राष्ट्रीय पुरस्कार 2025 , तसेच बारामती येथील प्रा. गोरख साठे सचिव बाबू जगजीवन राम कला संस्कृती साहित्य अकादमी महाराष्ट्र प्रदेश यांना इंडियन स्टार अवॉर्ड 2025 , देऊन सन्मानित करण्यात आले.तसेच खारघर नवी मुंबई येथील डॉ. विजय मोरे यांना भारतरत्न डॉक्टर बी आर आंबेडकर जीवन गौरव पुरस्कार 2025 तसेच पुणे येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ नागपूर या विद्यापिठाचे माजी कुलगुरू डॉ.एस. एन. पठाण यांना भारतरत्न डॉ ए.पी.जे .अब्दुल कलाम राष्ट्रीय पुरस्कार 2025 देऊन सन्मानित करण्यात आले.तसेच डोंबिवली येथील संतोष केशव पांचाळ यांना महात्मा ज्योतिबा फुले राष्ट्रीय पुरस्कार 2025, भोर येथील अमित साबळे सर यांना महात्मा ज्योतिबा फुले राष्ट्रीय पुरस्कार 2025, निरा, येथील निवृत्त मुख्याध्यापक दिलीप नारायण साबळे यांना राजश्री शाहू महाराज राष्ट्रीय पुरस्कार 2025 पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.तसेच आर्मी ऑफिसर धनंजय डांगळे यांना लॉर्ड गौतम बुद्ध राष्ट्रीय पुरस्कार 2025 व भारतरत्न डॉ ए.पी.जे.अब्दुल कलाम राष्ट्रीय पुरस्कार 2025 यावेळी मान्यवरांच्या उपस्थितीत नवव्या राष्ट्रीय परिसंवादात देऊन सन्मानित करण्यात आले.यावेळी गोव्याचे माजी उपमुख्यमंत्री चंद्रकांत कवळेकर यांना भारतरत्न डॉक्टर बी आर आंबेडकर लाईफ टाईम अॅचमेंट नॅशनल अवॉर्ड 2025 पुणे येथील देवयानी पालवे यांना वीरांगणा सावित्रीबाई फुले राष्ट्रीय पुरस्कार 2025 प्रीती विक्रांत यन्नोवार पुणे यांना विरांगणा सावित्रीबाई फुले राष्ट्रीय पुरस्कार 2025 तसेच प्रदीप कुमार पासवान बिहार यांना वीर बिरसा मुंडा राष्ट्रीय पुरस्कार 2025 मृत्युंजय शर्मा बिहार यांना राष्ट्रसंत कबीर पुरस्कार 2025 बुलबुल कुमारी बिहार यांना विरांगणा सावित्रीबाई फुले राष्ट्रीय पुरस्कार 2025 तसेच मणिपूर येथील जवळजवळ 18 लोकांना त्यांच्या विशेष सामाजिक सेवा कार्याबद्दल गौरविण्यात आले.व सन्मानित करण्यात आले.त्यामध्ये मुंबईचे सुप्रसिद्ध ज्योतिष विशारद डॉ.संदीप कोचर यांना ज्योतिष रत्न राष्ट्रीय पुरस्कार 2025 व पपीठला रविकांता तेलंगणा यांना राजश्री शाहू महाराज राष्ट्रीय पुरस्कार 2025 देऊन गौरविण्यात आले असल्याची माहिती संस्थेचे प्रदेश सचिव प्राध्यापक गोरख साठे बारामती यांनी सांगितले.यावेळी मनीपुर येथील सुमन यशस्वी राय यांना भारतरत्न डॉक्टर बी आर आंबेडकर राष्ट्रीय पुरस्कार 2025 ,अल्ताफ हुसेन मनिपुर भारतरत्न बी आर आंबेडकर नॅशनल अवॉर्ड 2025 कोरीमयूम असलम खान मनिपुर यांना भारतरत्न बी आर आंबेडकर राष्ट्रीय पुरस्कार 2025 एस के वाजीद मनिपुर यांना भारतरत्न एपीजे अब्दुल कलाम राष्ट्रीय पुरस्कार 2025, एस.एम .जलाल मनिपुर यांना बी आर आंबेडकर राष्ट्रीय पुरस्कार 2025 वांगखेम शोबा सिंग यांना भारतरत्न एपीजे अब्दुल कलाम राष्ट्रीय पुरस्कार 2025 वाहिंगबाम आनंद सिंग यांना भारतरत्न बी आर आंबेडकर राष्ट्रीय पुरस्कार 2025 ,चुगखाम शरदचंद्र सिंग यांना भारतरत्न डॉ.एपीजे अब्दुल कलाम राष्ट्रीय पुरस्कार 2025 देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी मान्यवरांच्या उपस्थितीत नवव्या राष्ट्रीय परिसंवादामध्ये भारतीय दलित साहित्य अकादमी राष्ट्रीय सेक्रेटरी डॉक्टर ह्युमनाम महेंद्र कुमार सिंग यांना लार्ड गौतम बुद्ध आंतरराष्ट्रीय पुरस्कार 2025 यावेळी मान्यवरांच्या उपस्थितीत सन्मानित करण्यात आले अल्ताफ हुसेन राजन मनीपुर यांनी तो आंतरराष्ट्रीय पुरस्कार युमनाम महेंद्रसिंग कुमार सिंग यांचे वतीने सत्कार सन्मान चिन्हांचे स्वीकार केला.
ओनम बोबो मिट्टी मणिपूर भारतरत्न डॉ ए.पी.जे .अब्दुल कलाम राष्ट्रीय पुरस्कार 2025 देऊन गौरविण्यात आले. तेलंगणा येथील पपीटला रविकांता यांना राजश्री शाहू महाराज राष्ट्रीय पुरस्कार 2025 व भारत भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय पुरस्कार 2025 देऊन सन्मानित करण्यात आले. बारामती येथील पत्रकार उपचंद शेलार यांना भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय पुरस्कार 2025,व खारघर येथील पत्रकार आप्पासाहेब मगर यांना बेस्ट जर्नालिस्ट नॅशनल एक्सलन्स अवॉर्ड 2025 देऊन गौरविण्यात आले .मुक्ताताई लोखंडे धाराशिव पोलीस कर्मचारी यांना एपीजे अब्दुल कलाम राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.स्नेहल मून नाशिक यांना विरांगणा सावित्रीबाई फुले राष्ट्रीय पुरस्कार अर्चना जाधव यांना विरांगणा सावित्रीबाई फुले राष्ट्रीय पुरस्कार, देऊन गौरविण्यात आले.यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मा.खा. डॉ. सुनील गायकवाड लातूर यांच्या शुभहस्ते देशातील जवळजवळ 200 सामाजिक सेवा कार्यकर्त्यांना यावेळी गौरविण्यात आले हा कार्यक्रम इमेज इंटरनॅशनल रिसर्च असोसिएशन गोवा व नॅशनल प्रधान मुख्य सरपंच संघ नवी दिल्ली तसेच महाराष्ट्र प्रदेश बाबू जगजीवन राम कला संस्कृती साहित्य अकादमी राज्य सचिव प्रा गोरख साठे व डॉक्टर बी एन खरात यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते या कार्यक्रमासाठी जवळजवळ देशातील 200 ते 250 सेवा कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते शेवटी या कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने संपन्न होऊन या कार्यक्रमांमध्ये भारतातील सामाजिक समता या विषयावरील विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांची सामाजिक समतेच्या विचारावरती आणि राज्यघटनेच्या समोरील असणारे आव्हाने या संदर्भामध्ये अनेक पुरस्कार करते व्यक्तीने आपले विचार प्रकट केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आर्ट्स अँड कल्चरल डिपार्टमेंट पणजी गोवा येथील कार्यकर्त्यांनी खूप मेहनत आणि सहकार्य केले अशा पद्धतीने बाबू जगजीवन राम कला संस्कृती साहित्य अकादमी महाराष्ट्र प्रदेश सचिव तसेच इमेज इंटरनॅशनल रिसर्च असोसिएशन गोवा आणि नॅशनल प्रधान मुखिया सरपंच संघ व बाबूजी जीवन राम कला संस्कृती साहित्य अकादमी दिल्ली अंतर्गत महाराष्ट्र प्रदेशच्या सर्व कार्यकर्त्यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी खूप मेहनत घेतली कष्ट घेतलं अशा पद्धतीने भारतातील सामाजिक समता या विषयावरच्या राष्ट्रीय परिसरात पणजी गोवा येथे संपन्न झाला
या कार्यक्रमाचे आयोजन बाबू जगजीवन राम कला संस्कृती साहित्य अकादमी महाराष्ट्र प्रदेश सचिव प्राध्यापक गोरख साठे बारामती व इमेज इंटरनॅशनल रिसर्च असोसिएशन गोवा या संस्थेचे चेअरमन प्राध्यापक डॉक्टर बी एन खरात यांनी केले होते शेवटी राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता संपन्न झाली