मा.उच्च न्यायालयाचे आदेशानुसार पर्यावरण संरक्षणासाठी माघी उत्सवात प्लास्टर ऑफ पॅरिसच्या;श्रीगणेशमूर्तींचे विसर्जन महानगरपालिकेने निर्माण केलेल्या कृत्रिम विसर्जन तलावातच करण्याचे आवाहन
मा. उच्च न्यायालयाचे दि. 30 जानेवारी 2025 रोजीच्या आदेशानुसार राज्यात प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीची विक्री करण्यास बंदी आहे. तसेच त्या मूर्तींची नैसर्गिक तलावामध्ये विसर्जनासाठी बंदी आहे.
या अनुषंगाने माघी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार, नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने प्लास्टर ऑफ पॅरिसच्या श्रीगणेशमूर्ती विसर्जनासाठी ठिकठिकाणी 26 कृत्रिम विसर्जन तलावांची निर्मिती करण्यात येत आहे. यावर संबंधित विभाग कार्यालयांचे सहा.आयुक्त तथा विभाग अधिकारी यांचे निरीक्षण व दोन्ही परिमंडळांचे उपआयुक्त यांचे नियंत्रण असणार आहे.
तरी मा.उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टीने नागरिकांनी माघी गणेशोत्सवात प्रतिष्ठापना केलेल्या प्लास्टर ऑफ पॅरिसच्या श्रीमूर्तींचे विसर्जन आपल्या नजिकच्या कृत्रिम विसर्जन तलावातच करावे. तसेच शाडूच्या मूर्तींचेही विसर्जन पर्यावरणशील दृष्टीकोन जपत कृत्रिम विसर्जन तलावात करावे असे आवाहन करण्यात येत आहे.
· कृत्रिम विसर्जन तलावांची यादी -
दिघा विभाग – 4 कृत्रिम तलाव
1 खोकड तलाव जवळ
2 गणपतीपाडा पेट्रोल पंपाजवळ
3 मनुभाई मैदान
4 रावली मिलजवळ
ऐरोली विभाग – 3 कृत्रिम तलाव
1 दिवा तलाव, सेक्टर 9 जवळ
2 ऐरोली नाका तलाव, सेक्टर 1 जवळ
3 खाडी तलाव, सेक्टर 20 जवळ
घणसोली विभाग – 4 कृत्रिम तलाव
1 रबाले तलाव जवळ
2 गुणाली तलाव जवळ
3 खदाण तलाव (राजीव गांधी तलाव) जवळ
4 छत्रपती शिवाजी महाराज तलाव जवळ
कोपरखैरणे विभाग – 3 कृत्रिम तलाव
1 धारण तलाव, सेक्टर 19 जवळ
2 महापे तलाव जवळ
3 महापे शाळा मैदान
तुर्भे विभाग – 3 कृत्रिम तलाव
1 कोपरीगाव तलाव जवळ
2 तुर्भेगाव तलाव जवळ
3 खोकड तलाव सानपाडा जवळ
वाशी विभाग – 2 कृत्रिम तलाव
1 वाशी तलाव सेक्टर 7 जवळ
2 जुहूगाव सेक्टर 12
नेरूळ विभाग – 2 कृत्रिम तलाव
1 चिंचोली तलाव शिरवणे जुईनगर जवळ
2 नेरूळ गाव तलाव जवळ
बेलापूर विभाग – 5 कृत्रिम तलाव
1 आग्रोळी तलाव जवळ
2 बेलापूर गाव तलाव जवळ
3 करावे तलाव जवळ
4 दारावे तलाव जवळ
5 दिवाळे जेट्टी जवळ