कासाडी नदी संवर्धनाच्या कामाला लवकरात लवकर सुरुवात करा
- आमदार प्रशांत ठाकूर यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी
या संदर्भात आमदार प्रशांत ठाकूर यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले असून या निवेदनात म्हंटले आहे कि, पनवेल तालुक्यातील तळोजा औद्योगिक क्षेत्रातील कासाडी नदीच्या संवर्धनाचा प्रश्न अनेक दिवसांपासून प्रलंबित आहे. कासाडी नदीपात्रात अत्यंत घातक दुषित पाणी सोडले जाते, त्यामुळे परिसर अत्यंत प्रदुषित झाला आहे व आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होत आहे. या नदीत होणाऱ्या प्रदुषणाबाबत परिसरातील नागरिकांच्या तक्रारी स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणून माझ्याकडे प्राप्त झाल्या आहेत. घातक वायू रसायने प्रक्रिया न करता नदीमध्ये सोडल्यामुळे नदीमधील जैवविविधता धोक्यात आली असून सदर नदीच्या संवर्धनासंदर्भात मी वारंवार शासनाचे लक्ष वेधले आहे. शासनाकडून नदीच्या संवर्धनाबाबत तातडीने पाऊल उचलणे गरजेचे असून तळोजा एमआयडीसीमधील प्रदूषणाला आळा घालण्यासाठी कासाडी नदीच्या संवर्धनाच्या कामास लवकरात लवकर सुरूवात करण्याचे आदेश संबंधिताना देण्यात यावे, असेही या निवेदनात अधोरेखित करण्यात आले आहे.