राष्ट्रीय बौद्धिक दिव्यांगजन सशक्तीकरण संस्थेमध्ये जागतिक दिव्यांग दिन दिमाखात साजरा!
खारघर येथील राष्ट्रीय बौद्धिक दिव्यांगजन सशक्तीकरण संस्था,नवी मुंबई या संस्थेचा जागतिक दिव्यांग दिन मंगळवार दिनांक:3 डिसेंबर 2024 रोजी मोठ्या दिमाखात संपन्न झाला.
हा कार्यक्रम 'राष्ट्रीय बौद्धिक दिव्यांगजन सशक्तीकरण संस्थेचे प्रमुख डॉ. बी. वी. रामकुमार आणि संस्थेचे प्रभारी अधिकारी डॉ. रवी प्रकाश सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. या दिवशी सांस्कृतिक कार्यक्रमाचे ही आयोजन करण्यात आले होते.
या दिनाचे औचित्य साधून दिव्यांग जन-जागृतीसाठी खारघर मधील 'उत्सव चौक' ते सेक्टर-5" परिसरात सकाळी प्रभात फेरी काढण्यात आली होती. या प्रभात फेरीत बौद्धिक दिव्यांग मुले, त्यांचे पालक, प्रशिक्षणार्थी तसेच संस्थेचे सर्व कर्मचारी सहभागी झाले होते, मुलांनी प्रभात फेरीमध्ये वेगवेगळ्या दिव्यांगाच्या माहिती विषयी बहुभाषिक संदेशांचे फलक हाती घेतले व घोषणाही दिल्या. ही प्रभात फेरी संस्थेचे प्रभारी अधिकारी डॉ. रवी प्रकाश सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या रॅली चे समन्वयन श्री. ज्ञानेश्वर सावंत यांनी केले.
सांस्कृतिक कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे लाभले होते, सन्मानीय अतिथि होत्या श्रीमती सरिका प्रकाश, अध्यक्ष, इनर व्हील, अतिथि होते -श्रीमती मेर्सी इट्टी, प्रभारी, प्रफुलता, डॉन बॉस्को स्कूल, प्रमुख पाहुणे श्री रणधीर कुमार ठाकूर, सहायक आयकर आयुक्त, प्रतिनिधि- कु. अरुणिमा, मेडिकल सोशल वर्कर, हंस फाउंडेशन,
डॉ. शिवानी बंधू, दंत चिकित्सक हंस फाउंडेशन हे उपस्थीत होते.
या कार्यक्रमाचे बौद्धिक दिव्यांगजन मुले व त्यांचे पालक, प्रशिक्षणार्थी यांनी सहभाग घेतला होता. यामध्ये नृत्य, गायन, नाटक, इत्यादी कलाकृतींचे सादरीकरण करण्यात आले.
यानंतर प्रमुख सर्व पाहुण्यांनी त्यांच्या संस्थेकडून राष्ट्रीय संस्थे सोबत भविष्यातील होणाऱ्या उपक्रमांची माहिती तसेच सहकार्याची हमी दिली.
यानंतर संस्थेचे प्रभारी अधिकारी डॉ. रवी प्रकाश सिंह सर यांनी दिव्यांगजन सशक्तीकरण या बद्दल उपस्थितांना मार्गदर्शन केले, व संस्थेच्या भविष्यातील उपक्रमाविषयी माहिती दिली. तसेच या वर्षीची ची युनाइटेड नेशन्स ची थीम "समावेशक आणि शाश्वत भविष्यासाठी दिव्यांग व्यक्तींच्या नेतृत्वाला प्रोत्साहन " यावर सर्वाना मार्गदर्शन केले. याच दरम्यान इनर व्हील या संस्थेमार्फत डॉ रवी प्रकाश सिंह यांना अध्यापनातील उत्कृष्टतेसाठी शैक्षणिक पुरस्कार देण्यात आला.
त्यानंतर याच दिवशी संस्थेमध्ये द हंस फॉउंडेशन मार्फत मेडिकल कॅम्प आयोजित करण्यात आला होता. या कॅम्पमध्ये डॉक्टरांच्या टीममध्ये डॉ. शिवानी बंधू, दंत चिकित्सक हंस फाउंडेशन ह्या आल्या होत्या. सुमारे 20 बौद्धिक दिव्यांग मुलांची तपासणी करण्यात आली. व त्या संबंधित औषधे देण्यात आले. ही मेडिकल तपासणी श्रीमती अनुषा संपत यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
या संपूर्ण कार्यक्रमामध्ये बौद्धिक दिव्यांगजन मुले व त्यांचे पालक, प्रशिक्षणार्थी तसेच संस्थेचे कर्मचारी यांनी सहभाग घेतला होता. या कार्यक्रमाचे समन्वयन श्रीमती ज्योती खरात व्याख्याता विशेष शिक्षण रा बौ स सं क्षे के न मुं यांनी केले.