जागृती फाऊंडेशन च्या हरिग्राम ,नेरे विभागीय अध्यक्ष पदी;ऍड रुपेश जोशी यांची नियुक्ती

जागृती  फाऊंडेशन च्या हरिग्राम ,नेरे  विभागीय अध्यक्ष पदी;ऍड  रुपेश जोशी यांची  नियुक्ती



पनवेल /प्रतिनिधी
रायगड जिल्ह्यात सामाजिक कामात अग्रेसस असलेल्या जागृती फाऊंडेशन या सामाजिक संगठनेकडे अनेक तरुण तरुणी संस्थेचे संस्थापक  अध्यक्ष निलेश सोनावणे यांच्या सोबत काम करण्यास पुढे येत आहेत  .,गेल्या महिन्यातच पन्नास हुन अधिक पनवेल च्या विविध भागातील महिला संस्थेसोबत जोडल्या गेल्या .संस्थेचे सामाजिक काम पाहून  हरिग्राम येथील ऍड  रुपेश जोशी यांनी देखील सदस्यत्व घेतेले होते  संस्थेचे अध्यक्ष निलेश सोनावणे यांनी जोशी यांना हरिग्राम  ,नेरे, दूदरे  विभागीय अध्यक्ष पदाची नुकतीच  जबाबदारी दिली आहे .
गोर गरीब जनतेची सेवा करीत अनेकांना आपले   मूलभूत हक्क मिळून देणाऱ्या जागृती फाऊंडेशन  या सामाजिक संस्थे सोबत काम करण्याची इच्छा अनेक जण व्यक्त करतात निस्वार्थ हेतूने काम करणाऱ्या व्यक्तींना संस्थेमध्ये समाविष्ट करून सामाजिक काम करण्याची संधी दिली जाते. नावासाठी काम नाही तर लोकांचे काम होण्यासाठी साठी काम करायचे , त्यांचे समाधान हीच आपल्या कामाची पावती असे उद्धिष्ट डोळ्यासमोर ठेऊन संस्था गेली अनेक वर्ष सामाजिक काम करीत आहेत .
संस्थेचे संस्थापक  अध्यक्ष निलेश सोनावणे  यांच्याकडे अनेक जण विविध समस्या घेऊन येत असतात त्या सोडवण्यासाठी निलेश सोनावणे हे नेहमीच अग्रेसर असतात आपल्याकडे आलेल्या प्रत्येकाचे  निस्वार्थ पणे काम कसे आपल्या हातून होईल या कडे  प्रयत्न असतात
एड रुपेश जोशी यांना सामाजिक कामाची  आवड असल्याने आणि जागृती फाऊंडेशन चे काम ते अनेक वर्षे जवळून जवळून  पाहत असल्याने त्यांनी  संस्थे सोबत काम करण्याची इच्छा व्यक्त केली होती संस्थेचे अध्यक्ष निलेश सोनावणे यांनी त्यांच्यावर हरिग्राम  ,नेरे, दूदरे  विभागीय अध्यक्ष पदाची जबाबदारी दिली आहे . यावेळी तळोजा विभागीय अध्यक्ष कलेपेश कांबळे ,उपाध्यक्ष संदेश पाटील , सरचिटणीस कुवर पाटील  वाकडी विभागीय अध्यक्ष  दीपक भोपी , प्रभाग क्रमांक २ चे अध्यक्ष विकेश पाटील ,सोमटणे विभागीय अध्यक्ष मयूर गायकवाड ,प्रभाग क्रमांक १ चे अध्यक्ष अतुल दवणे आदी जण उपस्थित होते .

Popular posts
सिडकोच्या मुजोर धोरणांना लगाम; विक्रांत पाटील यांच्या पाठपुराव्याला यश!
Image
भाजपा नगरसेविका नेत्रा किरण पाटील व युवाप्रेरणा सामाजिक संस्थेचे अध्यक्ष किरण पाटील यांच्या वतीने दोन दिवसीय आधार व मोफत आयुष्यमान भारतकार्ड शिबिर संपन्न
Image
हाय टेन्शन तार तुटून पनवेल पंचशील नगर झोपडपट्टीत आग भडकली अनेक झोपड्या जळून खाक; प्रशासनाचा तत्पर हस्तक्षेप
Image
आमदार विक्रांत पाटील यांच्या लढाऊ पाठपुराव्याला यश!-सिडकोच्या LIG व EWS घरांच्या किमती झाल्या 10% नी कमी;महायुती सरकारची सभागृहात घोषणा!
Image
पनवेल महानगरपालिकेला ‘माझी वसुंधरा अभियान 3.0’ अंतर्गत मिळालेल्या राज्यस्तरीय पारितोषिकातून सौर-ट्री प्रकल्पांना गती
Image