उरण मधे महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचारात डबल इंजिनची ताकद ! महेंद्रशेठ घरत हे मनोहर भोईर यांना निवडूण आणण्यासाठी मैदानात

 उरण मधे महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचारात डबल इंजिनची ताकद !   महेंद्रशेठ घरत हे मनोहर भोईर यांना निवडूण आणण्यासाठी मैदानात 




उरण दि ८(विठ्ठल ममताबादे )निवडणुकीच्या दृष्टीने अतिशय महत्वाच्या असलेल्या उरण विधानसभा मतदार संघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार मनोहर भोईर यांना कॉंग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांनी अधिकृतपणे दिलेल्या पाठींब्यामुळे महेंद्रशेठ घरत यांची संपूर्ण ताकद मनोहर भोईर यांच्या पाठीशी उभी राहिल्याने डबल इंजिनचा प्रचाराचा झंझावात उरण मधे पहावयास मिळत आहे. महाविकास आघाडीच्या उमेदवारास मोठ्या मताधिक्याने निवडून आणण्यासाठी स्वतः महेंद्र घरत यांनी कंबर कसली असून कॉंग्रेस पक्षाची सर्वतोपरी ताकद मनोहर भोईर यांच्या पाठीशी उभी केली आहे. आज जासई येथून प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी महेंद्रशेठ घरत हे मनोहर भोईर यांच्या खांद्याला खांदा लावून प्रचार करताना दिसले. महाराष्ट्रातील भ्रष्ट महायुती सरकार उलथुन  लावून महाविकास आघाडीचे सरकार स्थापन करणे हा उद्देश असल्याचे महेंद्र घरत यांनी स्पष्ट केले. या प्रचारावेळी शिवसेना ठाकरे गट व कॉंग्रेस पक्षाचे असंख्य कार्यकर्ते मैदानात उतरलेले दिसले. महेंद्रशेठ घरत यांच्या पाठींब्यामुळे डबल इंजिनची ताकद मिळालेले मनोहर भोईर हे हमखास निवडूण येतील असे जाणकारांचे मत आहे.

Popular posts
सिडकोच्या मुजोर धोरणांना लगाम; विक्रांत पाटील यांच्या पाठपुराव्याला यश!
Image
भाजपा नगरसेविका नेत्रा किरण पाटील व युवाप्रेरणा सामाजिक संस्थेचे अध्यक्ष किरण पाटील यांच्या वतीने दोन दिवसीय आधार व मोफत आयुष्यमान भारतकार्ड शिबिर संपन्न
Image
आमदार विक्रांत पाटील यांच्या लढाऊ पाठपुराव्याला यश!-सिडकोच्या LIG व EWS घरांच्या किमती झाल्या 10% नी कमी;महायुती सरकारची सभागृहात घोषणा!
Image
हाय टेन्शन तार तुटून पनवेल पंचशील नगर झोपडपट्टीत आग भडकली अनेक झोपड्या जळून खाक; प्रशासनाचा तत्पर हस्तक्षेप
Image
संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांच्या शुभहस्ते मराठा भवन कार्यालयाचे भव्य उद्घाटन आणि मराठा कृतज्ञता मेळावा उत्साहात संपन्न
Image