शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे पुण्यतिथीनिमित्त बाळासाहेब लॉ कॉलेज तर्फे वाहण्यात आली श्रद्धांजली
पनवेल, दि.17 (वार्ताहर) ः शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथीनिमित्त तळोजा फेज 2 येथे असलेल्या बाळासाहेब लॉ कॉलेजमध्ये त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.यावेळी ज्येष्ठ शिवसैनिक बाळाराम मुंबईकर यांनी हार घालून श्रद्धांजली वाहिली. त्यावेळी बाळासाहेब लॉ कॉलेजचे व शिवसेना रायगड जिल्हा संपर्कप्रमुख बबनदादा पाटील यांनी आदरांजली वाहिली. याप्रसंगी शिवसेनेचे मिथुन मढवी, सारंग मढवी, दुबे, युवराज पाटील, अभिमन्यू गोरे, तेजस पाटील, विक्की पाटील उपस्थित होते.