सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणमधील राजकोट किल्ल्यावर शिवरायांचा पुतळा कोसळल्याचा उरण शिवसेना (ठाकरे) पक्षाच्या वतीने जाहीर निषेध आंदोलन

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणमधील राजकोट किल्ल्यावर शिवरायांचा पुतळा कोसळल्याचा उरण शिवसेना (ठाकरे) पक्षाच्या वतीने जाहीर निषेध आंदोलन



माजी आमदार  मनोहरशेठ भोईर यांच्या नेतृत्वाखाली निषेध आंदोलन




उरण दि २९(विठ्ठल ममताबादे )महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणमध्ये असलेल्या राजकोट किल्ल्यावर मागील वर्षी श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला होता. ४ डिसेंबर २०२३ रोजी उभारण्यात आलेला शिवरायांचा हा पुतळा २६ ऑगस्ट २०२४ रोजी दुपारी जवळपास २ वाजताच्या सुमारास कोसळला. ३६०० कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेला शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती कोसळल्यानंतर शिवप्रेमींनी संताप व्यक्त केला असून सदर घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या उरण तालुक्याच्या वतीने गुरवार दि. २९ ऑगस्ट २०२४  रोजी  शिवसेना रायगड जिल्हाप्रमुख तथा माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांच्या नेतृत्वाखाली उरण शहरातील विमला तलाव येथे श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करून राज्य शासनाचा जाहीर निषेध करण्यात आला.

सदर वेळी उपजिल्हाप्रमुख  नरेश रहाळकर,  माजी नगराध्यक्ष  गणेश शिंदे, उपतालुकाप्रमुख  कमलाकर पाटील,  जयवंत पाटील, उपतालुका संघटक  रुपेश पाटील, अमित भगत, उपशहरप्रमुख  कैलास पाटील, माजी नगरसेवक  निलेश भोईर, माजी शहरप्रमुख  महेंद्र पाटील,  निरंतर कदम, भा वि सेनेचे जिल्हा संघटक  रोहिदास पाटील, युवासेनेचे शहरप्रमुख  आशिष गोवारी, महिला आघाडीच्या संपर्क संघटिका वंदना पवार, उपतालुका संघटिका मनिषा ठाकूर, उपतालुका संघटिका सुजाता पाटील, तालुका संघटिका रंजना तांडेल, विभाग संघटिका कल्पना गराडे, अल्पसंख्यांक सेल तालुका अध्यक्ष हुसेना शेख, शहराध्यक्ष मुमताज भाटकर, उपाध्यक्ष रुबीना कुट्टी, शाखा संघटिका हसीमा सरदार, कविता गाडे, लता लवे,शहर संघटक  महेश वर्तक, ग्राहक संरक्षण कक्षाचे शहर संघटक संदीप जाधव, सोशल मीडिया समन्वयक नितीन ठाकूर, नागाव सरपंच  सी के गायकवाड, वाहतूक सेनेचे विभाग अध्यक्ष  संतोष पाटील, ज्येष्ठ कार्यकर्ते श्री पाटील सर,  तांडेल, उपविभागप्रमुख रवींद्र पाटील, वैभव करंगुटकर, शाखाप्रमुख शैलेश भोईर,  अविनाश म्हात्रे,  सुरज मढवी, नियाज भाटकर, शेखर पडते, इस्माईल शेख, फतेह खान, शाहरुख गडी, रंजीत घरत, संदीप कोळी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.