नवी मुंबईत 1 हजाराहून अधिक नमुने घेत पाणी गुणवत्ता तपासणीची दुस-या टप्प्यातील विशेष चाचणी मोहीमही यशस्वी


 

नवी मुंबईत 1 हजाराहून अधिक नमुने घेत पाणी गुणवत्ता तपासणीची दुस-या टप्प्यातील विशेष चाचणी मोहीमही यशस्वी

*दोन आठवड्यात 2 हजारहून अधिक पाणी नमुन्यांची तपासणी*



 

नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने नागरिकांना करण्यात येणारा पाणीपुरवठा स्वच्छ व शुध्द असावा यादृष्टीने बेलापूर ते दिघा विभागांतील विविध ठिकाणांहून तसेच मुख्य जलवाहिनीवरून दररोज 110 पाणी नमुने घेऊन त्यांची गुणवत्ता तपासणी पाणीपुरवठा विभागामार्फत नियमित करण्यात येत असते.

त्यामध्ये पावसाळी कालावधी म्हणून लक्षणीय वाढ करावी व मोठ्या प्रमाणात पाणी नमुने तपासावेत असे निर्देश महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी पाणीपुरवठा विभागास दिले होते. त्यास अनुसरून अतिरिक्त शहर अभियंता श्री.अरविंद शिंदे व त्यांच्या अधिकारी, कर्मचारी सहका-यांनी सुयोग्य नियोजन करीत रविवारी सार्वजनिक सुट्टी असल्याने नागरिक घरी असतात हे लक्षात घेऊन पाणी गुणवत्ता तपासणीची विशेष मोहीम मागील रविवारी 4 ऑगस्ट रोजी राबविली व आज 11 ऑगस्ट रोजी पुन्हा एकवार संपूर्ण महापालिका क्षेत्रात ही विशेष मोहीम राबविली. या दोन्ही वेळेस नेहमीपेक्षा दहा पट अधिक म्हणजे प्रत्येक रविवारी 1 हजाराहून अधिक म्हणजे लागोपाठ दोन रविवारी 2 हजारपेक्षा अधिक पाणी नमुने वेगवेगळ्या ठिकाणाहून तपासण्यात आले.

यामध्ये महापालिका क्षेत्रातील घरे, सोसायट्या, गावठाण व झोपडपट्टी भाग, वाणिज्य संकुले, शैक्षणिक व इतर संस्था अशा विविध ठिकाणांहून तसेच मुख्य जलवाहिनी, भोकरपाडा जलशुध्दीकरण केंद्र, जलकुंभ अशा ठिकाणांवरूनही पाण्याचे नमुने घेऊन त्यांची तपासणी करण्यात आली.

या गुणवत्ता चाचणीमध्ये पिण्याच्या पाण्यातील पीएच (pH), Turbidity, TDS (Total Disssolved Solids), Residual Cholrine इत्यादी घटकांची चाचणी नवी मुंबई महानगरपालिकेच्या 8 ठिकाणी असलेल्या स्वत:च्या प्रयोगशाळांमध्ये करण्यात येत आहे. तसेच E-Coli ही चाचणी महानगरपालिकेच्या मध्यवर्ती प्रयोगशाळेत तसेच कोकण भवन येथील शासनाच्या प्रयोगशाळेमध्ये करण्यात येत आहे.

नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या दृष्टीने त्यांना उत्तम गुणवत्तेचा स्वच्छ व सुरक्षित पाणीपुरवठा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने आयोजित करण्यात आलेल्या या विशेष मोहीमेचे नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात स्वागत करण्यात आले.

याव्दारे पाण्याची गुणवत्ता लक्षात येत असून मागील रविवारी तपासणी करण्यात आलेल्या 1021 नमुन्यांपैकी 95 टक्के नमुने उत्तम असल्याचे आढळून आले असून आवश्यक त्या ठिकाणी क्लोरिनची मात्रा वाढवून जलशुध्दतेत सुधारणा केली जात आहे. महत्वाचे म्हणजे नमुना संख्येत लक्षणीय वाढ केल्याने अधिक बारकाईने पाणी गुणवत्ता लक्षात येत असून त्यानुसार आवश्यक सुधारणा करणे शक्य होत असल्याची माहिती अतिरिक्त शहर अभियंता श्री. अरविंद शिंदे यांनी दिली.

‘सफाई अपनाओ, बिमारी भगाओ’ या केंद्र सरकारच्या अभियानांतर्गत लागोपाठ 2 आठवडे आयुक्त महोदयांच्या निर्देशानुसार रविवारी ही मोहीम राबविण्यात आली असल्याची माहिती देत अतिरिक्त शहर अभियंता श्री.अरविंद शिंदे यांनी सकाळी 7 वाजल्यापासून पाणी नमुने संकलनाला सुरूवात झाली असून कार्यकारी अभियंता श्री. शंकर जाधव व श्री. वसंत पडघन, उपअभियंता स्वप्निल देसाई यांच्यासह सर्वच विभागातील उपअभियंता व कनिष्ठ अभियंता यांनी आपापल्या कार्यक्षेत्रात ही मोहीम यशस्वी करण्यासाठी योगदान दिले असल्याचे सांगितले.

        पाणी नमुने तपासणीसाठी नवी मुंबई महानगरपालिकेच्या आठ ठिकाणी प्रयोगशाळा असल्याने इतक्या मोठ्या प्रमाणात नमुने तपासणी करणे शक्य झाले असल्याचे ते म्हणाले. नागरिकांना स्वच्छ आणि सुरक्षित पाणीपुरवठ्यासाठी नवी मुंबई महानगरपालिका जागरूक व दक्ष असल्याचे सेक्टर 18 तुर्भे येथील मलप्रक्रिया केंद्रामध्ये असलेल्या प्रयोगशाळेमध्ये पाणी नमुने तपासणीप्रसंगी त्यांनी नमूद केले व नागरिकांनी या मोहीमेसाठी केलेल्या सहकार्याबद्दल आभार व्यक्त केले.
Popular posts
क्रिकेट सामन्यांचे शेकाप नेते प्रीतम म्हात्रे यांच्या हस्ते उद्घाटन
Image
मेडिकवर हॉस्पिटलमध्ये मिट्राक्लिप प्रक्रियेनंतर ७८ वर्षीय रुग्णाच्या हृदयविकारावर यशस्वी उपचार
Image
पनवेल युवा चे संपादक निलेश सोनावणे याना मुंबई विद्यापीठाचे मा कुलगुरू तथा मा खासदार डॉ भालचंद्र मुणगेकर यांच्या हस्ते साने गुरुजी राष्ट्र प्रेरणा पुरस्कार प्रदान
Image
प्रवेशद्वाराचे शेकाप नेते प्रीतम म्हात्रे यांच्या हस्ते भूमिपूजन
Image
जितेंद्र म्हात्रेंना राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर!पनवेल तालुका पोलीस ठाण्यात कर्तव्यावर
Image