रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्षपदी दत्तात्रेय म्हात्रे

 रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्षपदी दत्तात्रेय म्हात्रे




उरण दि २६(विठ्ठल ममताबादे )उरण तालुक्यातील नागाव येथील रहिवासी, काँग्रेस पक्षाचे जेष्ठ एकनिष्ठ कट्टर प्रामाणिक कार्यकर्ते म्हणून सुपरिचित असलेले दत्तात्रेय पांडुरंग म्हात्रे यांची रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. सदर नियुक्तीचे अधिकृत नियुक्तीपत्र महाराष्ट्र प्रदेश सचिव श्रीरंग बर्गे व रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत व जेष्ठ नेते जे. डी. जोशी यांनी दत्तात्रेय म्हात्रे यांना अलिबाग येथील कार्यालयात दिले.यावेळी महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस नंदा म्हात्रे,महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस चंद्रकांत पाटील, महाराष्ट्र प्रदेश चिटणीस ऍड.प्रविण ठाकूर, महाराष्ट्र प्रदेश फिशरमेन सेल अध्यक्ष मार्तंड नाखवा, रायगड जिल्हा वरिष्ठ उपाध्यक्ष महादेव कटेकर, वरिष्ठ उपाध्यक्ष राजा ठाकूर,रायगड जिल्हा उपाध्यक्ष किरीट पाटील, इटंक रायगड जिल्हा सरचिटणीस वैभव पाटील, उरण तालुका उपाध्यक्ष शेखर ठाकूर,उरण तालुका उपाध्यक्ष अविनाश पाटील,उरण तालुकाध्यक्ष विनोद म्हात्रे,चाणजे विभाग अध्यक्ष देविदास थळी, नागाव गाव अध्यक्ष हरेश्वर पाटील, कार्यकर्ते नंदकुमार म्हात्रे व इतर रायगड जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. नागाव गाव अध्यक्ष, नागाव ग्रामपंचायत सदस्य,उरण तालुका काँग्रेस उपाध्यक्ष, नागाव तंटामुक्ती अध्यक्ष असे अनेक विविध पदावर दत्तात्रेय म्हात्रे यांनी काम केले आहे.गोरगरिबांच्या अडी अडचणीत ते नेहमी धावून जातात. काँग्रेस पक्षाच्या विचारांशी,कार्याशी ते एकनिष्ठ व प्रामाणिक असल्याने दत्तात्रेय पांडुरंग म्हात्रे यांच्यावर रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.सच्चा प्रामाणिक एकनिष्ठ काँग्रेस कार्यकर्त्याची रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्याने दत्तात्रेय पांडुरंग म्हात्रे यांच्यावर सर्वच स्तरातून शुभेच्छा व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. या नियुक्तीबद्दल नवनियुक्त रायगड जिल्हा काँग्रेस कमिटी उपाध्यक्ष दत्तात्रेय पांडुरंग म्हात्रे यांनी काँग्रेसच्या वरिष्ठ पातळीवरील सर्व नेत्यांचे तसेच पदाधिकारी कार्यकर्त्यांचे जाहीर आभार मानले आहेत.
Popular posts
ठाणे आणि विटावा परिसरात "जनसभा" दिवाळी विशेषांकाचे प्रकाशन आणि वितरण
Image
आमदार विक्रांत पाटील यांना महाराष्ट्र प्रदेश निवडणूक संचालन समितीमध्ये 'राज्य निवडणूक समन्वयक' म्हणून विशेष जबाबदारी!
Image
८०० ग्रॅम वजनाच्या अकाली जन्मलेल्या बाळाची मृत्यूशी झुंज यशस्वी-नवी मुंबईतील मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये यशस्वी उपचार
Image
यूथ महाराष्ट्र संपादिका दिपालीताई पारसकर यांचा वाढदिवस साजरा – सामाजिक उपक्रमातून अनोखा आदर्श
Image
डॉ. नंदकुमार मारुती जाधव फाउंडेशन संचालित बौद्धिक अक्षम मुलांच्या विशेष शाळेत बालदिन उत्साहात साजरा
Image