पनवेल महानगरपालिकेच्यावतीने सुरू "मुख्यमंत्री - माझी लाडकी बहीण" योजनेला महिलांचा मोठा प्रतिसाद;महानगरपालिका कार्यक्षेत्रात पाच प्रभागामध्ये वीस ठिकाणी मदत कक्ष सुरू


पनवेल महानगरपालिकेच्यावतीने सुरू "मुख्यमंत्री - माझी लाडकी बहीण" योजनेला महिलांचा मोठा प्रतिसाद;महानगरपालिका कार्यक्षेत्रात पाच प्रभागामध्ये वीस ठिकाणी मदत कक्ष सुरू



पनवेल, दि. 12: महिलांचे आरोग्य ,पोषण व आर्थिक स्वावलंबनासाठी राज्य शासनाच्या महिला व बाल विकास विभागाच्या शासन निर्णयान्वये “मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण” ही योजना सुरु करण्यात आलेली आहे. महापालिका कार्यक्षेत्रात या योजनेला महिलांचा मोठा प्रतिसाद पाहून आता महापालिकेच्यावतीने  31 ऑगस्ट पर्यंत पाच प्रभागामध्ये 20 ठिकाणी मदत कक्ष उभारण्यात आली आहेत. या मदत कक्षांतर्गत योजनेचे अर्ज भरण्यात येत आहेत. महापालिका क्षेत्रातील जास्तीत जास्त पात्र लाभार्थी महिलांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन आयुक्त श्री. मंगेश चितळे यांनी केले आहे. 

महानगरपालिका कार्यक्षेत्रात सदर योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने महापालिकेने विशेष  नियोजन केले आहे.या योजनेंतर्गत प्रत्येक पात्र महिलेला तिच्या स्वतःच्या आधार लिंक केलेल्या  बँक खात्यात डीबीटीद्वारे दरमहा दीड हजार इतकी रक्कम दिली जाणार आहे. उपायुक्त संतोष वारूळे यांच्या मार्गदर्शनाखाली पाच प्रभागामध्ये 20 ठिकाणी मदत कक्ष उभारण्यात आली आहेत. याठिकाणी अंगणवाडी, आशा सेविका, डेएनयुएलएम अंतर्गत बचत गटाच्या महिला, डाटा एन्ट्री ऑपरेटर, मदतनीस, शिपाई , सुरक्षा अधिकारी उपलब्ध करून देण्यात आले आहे.

 चौकट

मदत कक्षाची ठिकाणे 

1.पनवेल- डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन,  रोहिदास वाडा समाज मंदिर, संत साईबाबा शाळा, तक्का गाव (मराठी शाळा),  

2.खारघर -खारघर प्रभाग समितीमध्ये टॅक्स ऑफिस, प्राईड सोसायटी ( सेक्टर -7), विठ्ठल मंदिर बेलपाडा, खारघर नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र

3.कळंबोली  - कळंबोली  प्रभाग समिती कार्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन (रोडपाली), गणेश मंदिर सेक्टर 08, स्वामी समर्थ मठ सेक्टर04

4.कामोठे- कामोठे प्रभाग समिती कार्यालय,सिडको कम्युनिटी हॉल, सेक्टर 21, मोठा खांदा शाळा, छोटा खांदा मंदिर,

5.नावडे- नावडे उपविभागीय कार्यालय, नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र फेज2,तळोजा पाचनंद, ग्रामपंचायत कार्यालय टेंभोडे गाव, ग्रामपंचायत कार्यालय रोहिंजण गाव 

 चौकट

पात्रता व आवश्यक कागदपत्रे

1. महाराष्ट्र राज्यातील 21 ते 65 या वर्ष वयोगटातील विविहित, विधवा, घटस्फोटीत, परित्यक्त्या आणि निराधार महिला तसेच त्या कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिला.

2. लाभार्थ्यांचे आधार कार्डअसणे आवश्यक.

3. सक्षम प्राधिकारी यांनी दिलेला कुटुंब प्रमुखांचा उत्पन्न दाखला. ( वार्षिक उत्पन्न रु. २.५० लाखापर्यंत असणे अनिवार्य)

4.बँक खाते पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत.

5.पासपोर्ट आकाराचा फोटो

6. महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र (लाभार्थी महिलेकडे अधिवास प्रामणपत्र नसेल तर त्याऐवजी स्वत्:चे 15 वर्षापूर्वीचे रेशनकार्ड / ओळखपत्र/ शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र /जन्म दाखला या चारपैकी कोणतेही ओळखपत्र किंवा प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येणार आहे. (परराज्यात जन्म झालेल्या महिलेने महाराष्ट्रातील अधिवास असणाऱ्या पुरूषाबरोबर विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्यांच्या पतीचे जन्म दाखला/ शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र किंवा अधिवास प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात यावे)

7. लाभार्थ्यांचे स्वतःचे आधार लिंक असलेले बँक खाते तसेच मोबाईल नंबर आधार कार्डाशी लिंक असणे आवश्यक.

8.लाभार्थ्यांनी आधारकार्डवरील नाव आहे तसे लिहणे बंधनकारक राहील.