महापालिकेच्या चारही प्रभागांमध्येअतिक्रमण कारवाई


महापालिकेच्या चारही प्रभागांमध्येअतिक्रमण कारवाई


पनवेल,दि.13 : पनवेल महापालिकेच्या कामोठे, खारघर, नावडे उपविभाग, पनवेल, कळंबोली अशा चारही प्रभागांमध्ये अनधिकृत टपऱ्या, फूटपाथवरील अनधिकृत फेरीवाले, अतिक्रमण केलेल्या दुकानांवरती आयुक्त श्री.मंगेश चितळे यांच्या निर्देशानूसार पाच प्रभाग अधिकाऱ्यांनी अतिक्रमण पथकाच्या माध्यमातून कारवाई केली.

शनिवार दिनांक 8 जून रोजी आयुक्त श्री. मंगेश चितळे यांनी चारही प्रभागातील अतिक्रमण केलेल्या दुकानांवरती, अनधिकृत फेरीवाले, टपऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानूसार पनवेल महानगरपालिकेचे उपायुक्त मारूती गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली चारही प्रभागांमध्ये अतिक्रमण कारवाई केली जात आहे. प्रभाग समिती ‘क कामोठे मधील सेक्टर ११ येथील प्रस्तावित प्रभाग कार्यालय येथे अतिक्रमण केलेल्या अनधिकृत टपऱ्या, फेरीवाले यांच्यावरती जेसीबीच्या साहाय्याने आज निष्कासन कारवाई करण्यात आली . याचबरोबर कामोठे येथील सेक्टर 7 मधील  मोकळ्या भूखंडावरील अनधिकृतपणे उभ्या केलेल्या झोपड्यावर कारवाई करण्यात आली. खांदेश्वर रेल्वे स्थानकाजवळील अनधिकृत हातगाडे, फेरीवाले,अतिक्रमण केलेल्या टपऱ्या यावरती प्रभाग अधिकारी सदाशिव कवठे यांनी कारवाई केली.

 प्रभाग समिती अ उप विभाग नावडे फेज 1, फेज 2 येथील अनधिकृत नर्सरी, फेरीवाले यांच्यावरती  आज कारवाई करण्यात आली. याचबरोबर  दिनांक 12 जून रोजी प्रभात समिती अ उप विभाग नावडे सेक्टर 35 येथील अनधिकृत मटण व चिकन शॉप चे 13 ताडपत्री शेडवरती प्रभाग अधिकारी अमर पाटील यांनी तोडक कारवाई केली. याचबरोबर तळोजा मजकूर कमानीजवळील लहान मोठे चार अनधिकृत होर्डिंग तोडण्यात आल्या.

तसेच गेल्या मंगळवारी  दिनांक 11 जून रोजी खारघर प्रभाग समिती अ उप विभाग नावडे, पापडीचापाडा येथील अनधिकृत आठवडी बाजार बंद करण्यात आला

खारघरमधील सेक्टर 20,21, 2 येथे अनधिकृत हातगाड्या, फेरीवाले यांच्यावरती  अतिक्रमण पथकाने आज कारवाई केली. तसेच  कोपरा पुल येथे उभारलेल्या अनधिकृत झोपड्यांवरती आज प्रभाग अधिकारी जितेंद्र मढवी यांनी निष्कांसन कारवाई केली. 

पनवेल प्रभागामध्ये बस स्थानकाजवळील अनधिकृत टपरींवर आज प्रभाग अधिकारी रोशन माळी यांनी कारवाई केली. 

प्रभाग समिती ब अंतर्गत कळंबोली हद्दीतील फूटपाथवरील अनधिकृत फेरीवाले तसेच हायवेवरील अनधिकृत  सर्व हेल्मेट स्टॉल्सवर प्रभाग अधिकारी अरविंद पाटील यांनी  आज कारवाई करून त्यांचे  समान जप्त केले.

Popular posts
२२ एप्रिल रोजी शेलघर येथे काँग्रेसची आढावा बैठक.;सर्वच पदाधिकाऱ्यांना मोठया संख्येने उपस्थित राहण्याचे महेंद्रशेठ घरत यांचे आवाहन
Image
रोटरी क्लब ऑफ खारघर मिडटाऊनचे खारघर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये डायलिसिस सेंटरचे उदघाटन
Image
दिल्ली दरबारी महेंद्रशेठ घरत यांची तोफ धडाडली-काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी महेंद्रशेठ घरत यांचे केले कौतुक
Image
महाराष्ट्र विधानसभा उपाध्यक्ष आण्णा बनसोडेंचा जगदीश गायकवाड यांच्या निवासस्थानी जाहीर सत्कार
Image
कु.देवश्री प्रशांत शेडगे हिचा विदेशात डंका; कॉम्प्युटर क्राऊड मद्धे मास्टर करून पनवेल च्या शिरपेचात रोवला मानाचा तुरा
Image