कोव्हीड प्रतिबंधासाठी नवी मुंबई महानगरपालिकेची यंत्रणा सज्ज – आयुक्त्‍ श्री.राजेश नार्वेकर यांनी घेतला आढावा

                                                     

 

कोव्हीड प्रतिबंधासाठी नवी मुंबई महानगरपालिकेची यंत्रणा सज्ज – आयुक्त्‍ श्री.राजेश नार्वेकर यांनी घेतला आढावा



काही राज्यांमध्ये कोव्हीडचा जेएन – 1 या नवीन विषाणूप्रकारातले रुग्ण आढळत असून सिंधुदूर्ग, ठाणे भागातही काही रुग्ण आढळले आहेत. या अनुषंगाने खबरदारी घेत नवी मुंबई महापालिका आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांनी तातडीने बैठक घेत आरोग्य यंत्रणेसह संबंधित सर्व विभागांना दक्षतेने सज्ज राहण्याचे आदेश दिले आहेत. याबाबत मुख्यमंत्री ना.श्री. एकनाथ शिंदे यांनीही राज्यातील आरोग्य स्थितीचा आढावा घेतला असून सतर्कतेचे निर्देश दिल्यानुसार नवी मुंबई महानगरपालिका यंत्रणा तपासणी, उपचार व नियंत्रणात्मक उपाययोजनांकरीता सज्ज झालेली आहे.

नवीन प्रकारच्या कोव्हीड विषाणूमध्ये सर्दीखोकलाअंगदुखीडोकेदुखी यामध्ये तीव्र लक्षणे आढळत असून कोरडा खोकला दीर्घकाळ राहत असल्याचे निदर्शनास येत आहे. विशेषत्वाने सहव्याधी (कोमॉर्बिड) असणारे रुग्ण, आजारी असणारे ज्येष्ठ नागरिक, गरोदर स्त्रिया, लहान मुले यांनी दक्षता घेण्याची गरज असून गर्दीच्या ठिकाणी व आजाराची लक्षणे असल्यास मास्क वापरणे गरजेचे आहे. आता नाताळचा सण असून नववर्षाचा समारंभ साजरा करण्यासाठी नागरिक मोठया प्रमाणावर एकत्र जमण्याचे प्रसंग लक्षात घेऊन आजाराची लक्षणे असणाऱ्या व्यक्तींनी गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे अथवा मास्कचा वापर करणे आवश्यक आहे.

 अशा स्थितीत महानगरपालिकेची आरोग्य यंत्रणा सक्षमतेने कार्यरत राहण्याच्या दृष्टीने नमुंमपा आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांनी आरोग्य यंत्रणेचा बारकाईने आढावा घेतला. यामध्ये वाशी, नेरुळ व ऐरोली या महानगरपालिकेच्या तीन रुग्णालयात व्हेंटीलेटर्ससह 60 आयसीयू बेड्सची कोव्हीड रुग्णालय स्वरुपातील सुविधा (DCH), 200 ऑक्सिजन बेड्सची कोव्हीड आरोग्य केंद्र सुविधा (DCHC) आणि 200 सर्वसाधारण बेड्सची कोव्हीड काळजी केंद्र सुविधा (CCC)  तात्काळ कार्यान्वित करण्याचे निर्देश आयुक्तांनी यावेळी दिले.

 त्याचप्रमाणे दैनंदिन ओपीडीमध्ये जे रुग्ण संशयित वाटतात त्यांची कोव्हीड टेस्ट करुन घेण्याबाबत काळजी घ्यावी व या कार्यवाहीकडे नियमीतपणे बारकाईने लक्ष ठेवण्यासाठी नोडल अधिकारी यांची त्वरीत नेमणूक करण्याचेही आयुक्तांनी निर्देशित केलेयामधील अधिक काळजी घेण्याची गरज असलेल्या रुग्णांवर विशेष लक्ष देण्याचेही आयुक्तांनी सूचित केले.

नवी मुंबई महानगरपालिकेची स्वत:ची 4 हजार चाचण्या प्रतीदिन क्षमतेची आरटीपीसीआर लॅब असून ती कोव्हीड टेस्टींगसाठी सक्षमतेने कार्यान्वित राहील याकडेही विशेष लक्ष देण्याच्या सूचना आयुक्तांनी केल्यायेथील चाचण्यांवर कोव्हीड नियंत्रणासाठी नेमलेल्या नोडल अधिकाऱ्याने बारकाईने लक्ष देण्याचे व दैनंदिन अहवाल सादर करण्याचे निर्देश आयुक्तांमार्फत देण्यात आले.

या बैठकीस अतिरिक्त आयुक्त श्रीमसुजाता ढोलेप्रशासन विभागाचे उपआयुक्त श्रीशरद पवारशहर अभियंता श्रीसंजय देसाईवैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉप्रशांत जवादेउपआयुक्त डॉबाबासाहेब राजळेश्रीसोमनाथ पोटरेडॉ.श्रीराम पवारश्रीयोगेश कडूसकरडॉ.राहुल गेठेअतिरिक्त्‍ शहर अभियंता श्रीमनोज पाटील व श्रीशिरीष आरदवाडवैदयकीय अधिकारी डॉअजय गडदे आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते

त्यासोबतच अनुषांगिक रुग्णालयीन सुविधामनुष्यबळऔषधेपीपीई किट्समास्क्‍, सॅनिटायझर अशा विविध बाबींची उपलब्धता तपासून घ्यावी व त्याचा अहवाल सादर करावा असेही निर्देश आयुक्तांनी दिलेकोव्हीडचा नवीन विषाणू आढळला असला तरी नागरिकांनी घाबरुन जाण्याची गरज नसून कोणत्याही प्रकारे अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच चुकीच्या माहिती व बातम्या प्रसारित होणार नाहीत याची दक्षता घ्यावीत्याचप्रमाणे आजाराची लक्षणे असल्यास गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे व मास्कचा वापर करावा आणि योग्य औषधोपचार घ्यावा असे आवाहन नमुंमपा आयुक्त श्रीराजेश नार्वेकर यांनी केले आहे.