पनवेल महानगरपालिका व पिल्लई इंजिनिअरिंग महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने ई –कचरा जनजागृती कार्यशाळा
पनवेल,दि.17 : आयुक्त श्री.गणेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली माझी वसुंधरा अभियान 4.0 अंतर्गत पनवेल महानगरपालिका व पिल्लई इंजिनिअरिंग महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने ई –कचरा जनजागृती कार्यशाळा आयोजन दिनांक 14 ऑक्टोबर रोजी करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांना ई-कचऱ्यामुळे पर्यावरणावरती होणारे परिणाम यांची माहिती देऊन ई-कचरा कमी करण्यासाठीच्या उपायेयोजनांची माहिती देण्यात आली.
दिनांक 14 ऑक्टोबर हा आंतरराष्ट्रीय ई कचरा दिवस म्हणून साजरा केला जातो. या दिवसाचे औचित्य साधून उपायुक्त डॉ. वैभव विधाते यांच्यासूचनेनूसार झाले पिल्लई इंजिनिअरींग महाविद्यालयामध्ये कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेचे उद्घाटन प्राचार्य डॉ. संदिप जोशी, महापालिका पर्यावरण विभाग प्रमुख मनोज चव्हाण, एनएसएस कार्यक्रम अधिकारी अक्षय जाधव, महाविद्यालयाचे प्राध्यापक, यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये करण्यात आले. यावेळी इंजिनिअरींग महाविद्यालयचे प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी महापालिकेच्या सहकार्याने महाविद्यालयात सुरू करण्यात आलेल्या ई –कचरा केंद्राचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. विद्यार्थ्यांनी या केंद्रावरती आपला ई कचरा देण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. तसेच महापालिकेच्या सहकार्यातून हे केंद्रआता पुढील वर्षभर सुरू ठेवणार असल्याचे घोषित करण्यात आले. या उपक्रमामध्ये महाविद्यालयाच्यावतीने संपूर्ण सहाय्य देणार असल्याचे आश्वासन देण्यात आले.
तसेच यावेळी पॉवर पाँईट प्रेझेंटेशेनद्वारे ई-कचरा पर्यावरणासाठी किती घातक आहे, त्यामुळे हवामानात होणारे बदल, त्यांची विल्हेवाट लावण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली.