श्री साई गणेश मंदीराचा जिर्णोद्धार आणि श्री स्वामी समर्थ प्रतिमा प्रतिष्ठापना सोहळा संपन्न
खारघर (प्रतिनिधी)-श्री साई गणेश मंदीर खारघरचा जिर्णोद्धार आणि श्री स्वामी समर्थांच्या प्रतिमेच्या प्रतिष्ठापनेचा नेत्रदिपक आणि धार्मिक सोहळा गुढी पाडव्याच्या शुभ मुहुर्तावर सामाजिक कार्यकर्ते समीर कदम आणि श्री साई गणेश मंदीर ट्रस्टच्या पुढाराने संपन्न झाला.
या सोहळ्याची सुरूवात चैत्र शुद्ध १ बुधवार दिनांक २२ मार्चला सकाळी झाली आणि सांगता चैत्र शुद्ध २ गुरूवार दिनांक २३ मार्च हिंदु नव-वर्ष गुढी पाडव्याला झाली.शेकडो स्त्री-पुरूष भाविकांच्या दींडीने सर्व मुर्तींचे आगमन मंदीरात झाले.दुसऱ्या दिवशी पंडीतांच्या मंत्रघोषात होम-हवन करण्यात आले.या पवित्र होम-हवनासाठी परिसरातील २१ जोडप्यांनी पुजा करून या यज्ञामध्ये समिधांची आहुती दीली आणि हिंदु धर्म शास्त्राप्रमाणे मुर्तींची मंदीरात प्रतिष्ठापना करण्यात आली.
दोन दीवस चाललेल्या या सोहळ्यासाठी पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर,लोकनेते रामशेठ ठाकूर,भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील आणि कोकण म्हाडाचे माजी अध्यक्ष बाळासाहेब पाटील तसेच खारघमधील अनेक माजी नगरसेवक,भाजपा पदाधिकारी व वास्तुविहार-सेलिब्रेशन या गृहसंकुलाबरोबरच घरकुल-स्पॕघेटी आणि सेक्टर-१८ तसेच खारघरमधील भाविक स्री-पुरूष अबालवृद्ध मोठ्या संख्येने उपस्थित होते.