कोकण शिक्षक मतदार संघाचे उमेदवार बाळाराम पाटील यांच्या प्रचारार्थ जासई येथे संवाद मेळावा संपन्न
पदाधिकारी, कार्यकर्त्यांची,शिक्षकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती.
बाळाराम पाटील बहुमताने निवडून येणार
पदाधिकारी कार्यकतें शिक्षकांनी केला आत्मविश्वास व्यक्त.
पदाधिकारी कार्यकर्ते शिक्षकवर्ग लागले प्रचाराच्या कामाला.
बाळाराम पाटील यांचा विजय निश्चित असल्याचा सर्वत्र चर्चा.
उरण दि. .13 (विठ्ठल ममताबादे ) महाराष्ट्रात शिक्षक मतदार संघाचे निवडणूका जाहिर झाले असून भारत निवडणूक आयोगामार्फत कोकण शिक्षक मतदार संघाच्या निवडणूकीची घोषणा करण्यात आली असून कोकण विभागातील सर्व जिल्ह्यामध्ये तात्काळ प्रभावाने आचार संहिता सुद्धा लागू करण्यात आली आहे. कोकण विभाग शिक्षक मतदार संघातून शेतकरी कामगार पक्ष, आय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष )पुरस्कृत महाविकास आघाडीचे व पुरोगामी शिक्षक संघटनेचे टी.डि. एफ पुरस्कृत उमेदवार बाळाराम द.पाटील यांनी फॉर्म भरले आहे. निवडणूक प्रचारासाठी, आपली पहिली सभा बाळाराम पाटील यांनी लोकनेते दिबा पाटील यांच्या जन्मगावी उरण तालुक्यातील जासई गावात घेतली.गुरुवार दि 12/1/2023 रोजी लोकनेते दि. बा. पाटील साहेब मंगल कार्यालय जासई येथे संध्या 6 वा. शिक्षक संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.संध्याकाळी 6 ते 9 या वेळेत हा मेळावा संपन्न झाला.
जाहिर प्रचारार्थ आयोजित केलेल्या शिक्षक संवाद मेळाव्यात काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत, उपाध्यक्ष मिलिंद पाडगावकर, तालुकाध्यक्ष विनोद म्हात्रे, राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष मनोज भगत, शिवसेनेचे (उध्दव बाळासाहेव ठाकरे पक्षाचे) रायगड जिल्हाप्रमुख तथा माजी आमदार मनोहरशेठ भोईर, उपजिल्हाप्रमुख नरेश रहाळकर, तालुकाप्रमुख संतोष ठाकूर, शेतकरी कामगार पक्षाचे उरण तालुका चिटणीस विकास नाईक, रमाकांत पाटील,सुरेश पाटील, सरपंच संतोष घरत, माजी उप सभापती महादेव बंडा , महिला तालुकाध्यक्ष सीमा घरत,माजी जिल्हा परिषद सदस्य जीवन गावंड , रमाकांत म्हात्रे,कॉम्रेड भूषण पाटील, माजी सभापती नरेश घरत, कोकण शिक्षक मतदार संघाचे समन्वयक काशिनाथ पाटील, उदयोजक जे एम म्हात्रे, संदिप पाटील, आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
कोकण शिक्षक मतदार संघाची सार्वत्रिक निवडणूक 30 जानेवारी 2023 होत आहे.त्या अनुषंगाने उरण तालुक्यातील शाळा, संस्था प्रमुख, मुख्याध्यापक व शिक्षक यांचा निवडणूक प्रचारार्थ जाहिर मेळावा जासई येथे घेण्यात आला . यावेळी कोकण शिक्षक मतदार संघाचे उमेदवार,महाविकास आघाडी व पुरोगामी शिक्षक संघटना,व टि.डी.एफ पुरस्कृत उमेदवार बाळाराम पाटील यांनी उपस्थितांशी संवाद साधला. यावेळी बाळाराम पाटील म्हणाले की कोकण शिक्षक मतदार संघातील महाविकास आघाडी, पुरोगामी शिक्षक संघटना,टिडीएफचे उमेदवार म्हणून माझ्यावर उमेदवारीची जबाबदारी दिलेली आहे. शिक्षकांचे, शाळा संस्थाचे कर्मचाऱ्यांचे मी आजपर्यंत अनेक प्रश्न सोडविले आहेत.शिक्षकांच्या समस्या सोडविल्या. कोकणातील सर्व जिल्हे फिरलो,समस्या सोडविण्यासाठी प्राधान्य दिले. वेतनश्रेणी, तूकडी, पगारवाढ, अनुदान, बदली, वरिष्ठ श्रेणी, नोकरभरती आदी बाबत नेहमी आवाज उठविला आणि पुढेही आवाज उठवेन व शिक्षकांच्या सर्व समस्या सोडवेन असे अभिवचन यावेळी बाळाराम पाटील यांनी शिक्षकांना दिले.यावेळी भरघोस मतांनी निवडून देण्याचे विनंती यावेळी बाळाराम पाटील यांनी शिक्षकांना केली.या कार्यक्रमात प्रत्येक राजकीय पक्षाच्या पदाधिकारी यांनी बाळाराम पाटील यांना आपल्या पक्षाचा जाहिर पाठिंबा दिला. तसेच उपस्थित शिक्षकांनी सर्वांनी एकाचवेळी हात वर वरून बाळाराम पाटील यांना एकमुखी पाठिंबा दर्शविला. यावेळी पदाधिकारी कार्यकर्ते,मुख्याध्यापक,प्राचा र्य यांचेही भाषणे झाले, विविध संस्थेचे शिक्षक, मुख्याध्यापक प्राचार्य, विविध पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते यांनी बाळाराम पाटील हे बहुसंख्य मताधिक्याने निवडून येतील असा आत्मविश्वास व्यक्त केला. सदर मेळावा खेळीमेळीच्या वातावरणात संपन झाले असून सदर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन रमाकांत मोकल यांनी केले.