सावित्रीबाई फुले यांच्या राष्ट्रीय स्मारकासंदर्भात तात्काळ बैठक घेऊ;आवश्यक तेवढा निधी उपलब्ध करून देणार- विधानसभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

सावित्रीबाई फुले यांच्या राष्ट्रीय स्मारकासंदर्भात तात्काळ बैठक घेऊ;आवश्यक तेवढा निधी उपलब्ध करून देणार- विधानसभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे


नागपूर दि. २०: स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या सावित्रीबाई फुले यांचे राष्ट्रीय स्मारक पुणे येथील भिडे वाडा याठिकाणी करण्यासंदर्भात तात्काळ बैठक घेऊ आणि या राष्ट्रीय स्मारकासाठी आवश्यक तेवढा निधी उपलब्ध करून देण्यात येईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत सांगितले. विधानसभा सदस्य छगन भुजबळ यांनी सभागृहात मुद्दा उपस्थित केला होता. त्यावर निवेदन करताना मुख्यमंत्री श्री.  शिंदे म्हणाले, सावित्रीबाई फुले यांचे राष्ट्रीय स्मारक भिडे वाडा येथे करण्याबाबत राज्य शासन गंभीर आहे. लवकरच त्यासंदर्भात बैठक घेण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.



Popular posts
सिडकोच्या मुजोर धोरणांना लगाम; विक्रांत पाटील यांच्या पाठपुराव्याला यश!
Image
भाजपा नगरसेविका नेत्रा किरण पाटील व युवाप्रेरणा सामाजिक संस्थेचे अध्यक्ष किरण पाटील यांच्या वतीने दोन दिवसीय आधार व मोफत आयुष्यमान भारतकार्ड शिबिर संपन्न
Image
आमदार विक्रांत पाटील यांच्या लढाऊ पाठपुराव्याला यश!-सिडकोच्या LIG व EWS घरांच्या किमती झाल्या 10% नी कमी;महायुती सरकारची सभागृहात घोषणा!
Image
हाय टेन्शन तार तुटून पनवेल पंचशील नगर झोपडपट्टीत आग भडकली अनेक झोपड्या जळून खाक; प्रशासनाचा तत्पर हस्तक्षेप
Image
संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांच्या शुभहस्ते मराठा भवन कार्यालयाचे भव्य उद्घाटन आणि मराठा कृतज्ञता मेळावा उत्साहात संपन्न
Image