भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंती निमित्त आदिवासी बांधव नृत्य स्पर्धा
पनवेल(प्रतिनिधी) भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंती निमित्त आणि जनजाती गौरव दिनानिमित्त वनवासी कल्याण आश्रम व भारतीय जनता पार्टी च्या माध्यमातून पनवेल तालुक्यातील वाकडी येथे आदिवासी बांधव नृत्य स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडली.
या स्पर्धेचे उदघाटन पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच या स्पर्धेला भारतीय जनता पार्टी रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी सदिच्छा भेट देत भगवान बिरसा मुंडा यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन केले. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून भाजपचे उत्तर रायगड जिल्हा उपाध्यक्ष प्रल्हाद केणी, पनवेल तालुका उपाध्यक्ष संजय पाटील, माजी पंचायत समिती सदस्य भूपेंद्र पाटील, दुन्द्रे ग्रामपंचायत माजी सरपंच रमेश पाटील, सरपंच अनुराधा वाघमारे, वाकडी ग्रामपंचायत माजी सरपंच नरेश पाटील, मालडुंगी सरपंच हर्षदा चौधरी, आदिवासी समाजाच्या जिल्हाध्यक्षा ठमाताई पवार, नामदेव जमदाडे, राजेश भोईर, भगवान पाटील, शांताराम चौधरी, राजेश पाटील, संदीप शिंदे, नारायण भगत, सोमनाथ चौधरी, रामदास शेळके, विकास भगत, जोमा निरगुडा, उदय टिळक, सुदाम पवार, पदु वाघ, रुपेश भोईर, जनार्दन निरगुडा यांच्यासह इतर मान्यवर आणि पदाधिकारी उपस्थित होते.