किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत धान व भरडधान्य खरेदीकरिता ऑनलाईन पोर्टलवर शेतकरी नोंदणीकरिता 10 नोव्हेंबर पर्यंत मुदतवाढ

किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत धान व भरडधान्य खरेदीकरिता ऑनलाईन पोर्टलवर शेतकरी नोंदणीकरिता 10 नोव्हेंबर पर्यंत मुदतवाढ


     *अलिबाग, दि.28 (जिमाका):-* खरीप पणन हंगाम 2022-23 मध्ये किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत धान व भरडधान्य खरेदीकरिता ऑनलाईन पोर्टलवर शेतकरी नोंदणीकरिता दि.21 ऑक्टोबर 2022 अखेरपर्यंत मुदत देण्यात आली होती. तथापि, ऑनलाईन पोर्टलवरील माहितीनुसार, मागील हंगामांचा विचार करता शेतकरी नोंदणी पूर्ण झाली नसल्याचे दिसून आल्याने पणन हंगाम 2022-23 मध्ये किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत धान व भरडधान्य खरेदीकरिता ऑनलाईन पोर्टलवर शेतकरी नोंदणीकरिता, दि.10 नोव्हेंबर, 2022 अखेरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

     तरी याची नोंद घेवून जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी चालू वर्षाचा 7/12, चालू बँक खाते व स्पष्ट दिसणारे आधारकार्ड यासह आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत धान व भरडधान्य खरेदीकरिता खरेदी केंद्रावर स्वत: येवून नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर, जिल्हा पुरवठा अधिकारी मधुकर बोडके व जिल्हा पणन अधिकारी केशव ताटे यांनी केले आहे.



Popular posts
२२ एप्रिल रोजी शेलघर येथे काँग्रेसची आढावा बैठक.;सर्वच पदाधिकाऱ्यांना मोठया संख्येने उपस्थित राहण्याचे महेंद्रशेठ घरत यांचे आवाहन
Image
रोटरी क्लब ऑफ खारघर मिडटाऊनचे खारघर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये डायलिसिस सेंटरचे उदघाटन
Image
दिल्ली दरबारी महेंद्रशेठ घरत यांची तोफ धडाडली-काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी महेंद्रशेठ घरत यांचे केले कौतुक
Image
महाराष्ट्र विधानसभा उपाध्यक्ष आण्णा बनसोडेंचा जगदीश गायकवाड यांच्या निवासस्थानी जाहीर सत्कार
Image
कु.देवश्री प्रशांत शेडगे हिचा विदेशात डंका; कॉम्प्युटर क्राऊड मद्धे मास्टर करून पनवेल च्या शिरपेचात रोवला मानाचा तुरा
Image