सागरी सुरक्षिततेच्या दृष्टीने मासेमारी नौकेवरील कार्यरत नौकामालक,तांडेल व खलाशांना मिळणार क्यू आर कोड आधारकार्ड

सागरी सुरक्षिततेच्या दृष्टीने मासेमारी नौकेवरील कार्यरत नौकामालक,तांडेल व खलाशांना मिळणार क्यू आर कोड आधारकार्ड


अलिबाग,दि.14 (जिमाका):- केंद्र शासनाकडून मासेमारी नौकेवरील कार्यरत नौकामालक, तांडेल व खलाशी यांना सागरी सुरक्षिततेच्या दृष्टीने क्यू आर कोड असलेले आधार कार्ड देण्याबाबत कळविण्यात आले आहे. संस्थेमार्फत प्राप्त अर्ज व त्याचा गोषवारा नोडल अधिकाऱ्यांमार्फत प्रादेशिक आधार ओळखपत्रे कार्यालय यांच्या सॉफ्टवेअर द्वारे अपलोड करण्यात येतो.

     उर्वरित स्थानिक व परप्रांतीय खलाशी वर्ग तसेच क्रियाशील मासेमाऱ्यांना क्यू आर कोड असलेले ओळखपत्र देण्याच्या दृष्टीने दि.12 सप्टेंबर ते दि.12 ऑक्टोबर 2022 या कालावधीपर्यंत अर्ज घेवून कार्ड वितरीत करण्याची कार्यवाही करण्याबाबत मुख्य कार्यालयाने कळविले आहे. सागरी सुरक्षेच्या दृष्टीने वातावरण अत्यंत संवेदनशील असल्यामुळे समुद्रात मासेमारी करणाऱ्या सर्व नौकांची काटेकोर तपासणी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.  त्यादृष्टीने आपल्या कार्यक्षेत्रातील सागरी मासेमारी करणाऱ्या उर्वरित नौका मालक/ तांडेल/ खलाशी तसेच नव्याने आलेले तांडेल व खलाशी यांना नवीन आधार ओळखपत्र उपलब्ध करून देण्याबाबत त्वरित कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

     उर्वरित नौका मालक / तांडेल / स्थानिक व परप्रांतीय खलाशी तसेच नव्याने आलेले तांडेल व खलाशी यांचे अर्ज सहाय्यक आयुक्त, मत्स्यव्यवसाय, रायगड-अलिबाग या कार्यालयास सादर करावे जेणेकरून प्रादेशिक आधार ओळखपत्रे कार्यालय यांच्या सॉफ्टवेअर द्वारे अपलोड करून देणे सोयीचे होईल.

     ज्या नौका मालक / तांडेल / स्थानिक व परप्रांतीय खलाशी यांचे अर्ज या कालावधीत अपलोड होणार नाहीत त्यांना दि.19 ऑक्टोबर 2022 पासून समुद्रामध्ये मासेमारीकरिता सागरी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून जाता येणार नाही याची गांभीर्याने नोंद घ्यावी व तात्काळ कार्यवाही करावी, असे मत्स्यव्यवसाय सहाय्यक आयुक्त एस.आर.भारती यांनी कळविले आहे.


Popular posts
वसाहती मधील रस्ते व गटराची कामे लवकर पूर्ण करा-शिवसेना जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे यांनी घेतली पालिका आयुक्तांची भेट
Image
सिकेटी महाविद्यालयात माजी विद्यार्थी स्नेहसंमेलन संपन्न
Image
पनवेल तालुका पत्रकार विकास मंचाच्या ओळखपत्रांचे अनावरण ;शिर्डी अभ्यासदौऱ्यात नविन कार्यकारिणी सोबत सदस्यांनी घेतले श्री साईंचे आशिर्वाद
Image
आमदार प्रशांत ठाकूर यांचा मतांच्या आघाडीच्या संख्येत वृक्षारोपणाचा संकल्प;पांडवकडा येथे वृक्षारोपण करून शुभारंभ
Image
फसवे सोशल मीडिया ग्रुप्स आणि अनधिकृत गुंतवणूक योजनांबद्दल सतर्क रहा -एंजेल वनचे आवाहन
Image