नारळी पौर्णिमा रक्षाबंधन सणानिमित्त एनएमएमटी बससेवेची सुविधा


                                                                                                   

 

नारळी पौर्णिमा रक्षाबंधन सणानिमित्त एनएमएमटी बससेवेची सुविधा




     

     दि.11 ऑगस्ट 2022 रोजी “नारळी पौर्णिमासणानिमित्त ठाणे शहरात कळवा खाडीवरील पूल परिसर ( कोर्ट ते क्रिक नाका व छ्त्रपती शिवाजी महाराज शिवाजी चौक) तसेच जुना कळवा खाडी पूल सर्व प्रकारच्या वाहतुकीस बंद ठेवण्यात आला आहे.

     त्या अनुषंगाने ठाणे सिडको बस स्थानकाकडे जाणारे एनएमएमटीचे बसमार्ग क्र. 01, 03, 04, 07, 08, 11, 12, 24, 26, 27 या मार्गावरील बससेवा 10.00 वाजल्यानंतर “मुकंद कंपनी (पटनी नाका)” पर्यंत सिमित करण्यात येणार आहेत.

     तसेच बसमार्ग क्र. 02, 05 व 86 या मार्गावरील बसेसवा 11.00 वाजल्यानंतर बंद करण्यात येत आहेत.

     दि.11 ऑगस्ट 2022 रोजी रक्षाबंधन सणाच्या निमित्ताने इतर नियमित मार्गावर प्रवाशांच्या सेवेकरिता जादा बसेसची व्यवस्था उपक्रमाने केलेली आहे त्याचा तपशील खालीलप्रमाणे आहे.

अ.क्र. मार्ग क्र. मार्गाचे नांव बस संख्या

मार्ग क्र. 17 - नेरुळ रेल्वे स्थानक (पु) ते बामणडोंगरी रेल्वे स्थानक 4

मार्ग क्र. 23 - सिबीडी आर्टिस्ट कॉलनी से.08 ते खारकोपर रेल्वे स्थानक 4

मार्ग क्र. 31 - कोपरखैरणे बस स्थानक ते उरण 5

मार्ग क्र. 42 - वाशी रेल्वे स्थानक ते डोंबिवली 2

मार्ग क्र. 48 - बेलापूर रेल्वे स्थानक ते वाशिवली गाव/रसायनी 3

मार्ग क्र. 49 - बेलापूर रेल्वे स्थानक ते कर्जत 3

मार्ग क्र. 50 - कोपरखैरणे बस स्थानक ते पनवेल रेल्वे स्थानक 2

मार्ग क्र. 58 - बेलापूर रेल्वे स्थानक ते खोपोली 2

मार्ग क्र. 62 - वाशी रेल्वे स्थानक ते कल्याण रेल्वे स्थानक 3

मार्ग क्र. 66 - घणसोली रेल्वे स्थानक ते कल्याण रेल्वे स्थानक 2

मार्ग क्र. 82 - वाशी रेल्वे स्थानक ते दिवा रेल्वे स्थानक 3

     तरी सदर बस सेवेचा लाभ सर्व प्रवाशांनी घ्यावा असे आवाहन नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रमामार्फत करण्यात येत आहे.


Popular posts
सिडकोच्या मुजोर धोरणांना लगाम; विक्रांत पाटील यांच्या पाठपुराव्याला यश!
Image
भाजपा नगरसेविका नेत्रा किरण पाटील व युवाप्रेरणा सामाजिक संस्थेचे अध्यक्ष किरण पाटील यांच्या वतीने दोन दिवसीय आधार व मोफत आयुष्यमान भारतकार्ड शिबिर संपन्न
Image
आमदार विक्रांत पाटील यांच्या लढाऊ पाठपुराव्याला यश!-सिडकोच्या LIG व EWS घरांच्या किमती झाल्या 10% नी कमी;महायुती सरकारची सभागृहात घोषणा!
Image
हाय टेन्शन तार तुटून पनवेल पंचशील नगर झोपडपट्टीत आग भडकली अनेक झोपड्या जळून खाक; प्रशासनाचा तत्पर हस्तक्षेप
Image
संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांच्या शुभहस्ते मराठा भवन कार्यालयाचे भव्य उद्घाटन आणि मराठा कृतज्ञता मेळावा उत्साहात संपन्न
Image